खानापूर येथील बाजार पेठ, येथे असलेल्या श्री बसवेश्वर देवस्थान मधील नव्याने जीर्णोद्धारित करण्यात आलेल्या श्री महागणपती मंदिराचे कळसारोहन , मुर्ती प्रतिष्ठापना तसेच मंदिराचा उद्घाटन कार्यक्रम बुधवार दि. 22 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.
पूज्य श्री ष. ब्र. जडीसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी (दोड्याई) त्यांच्या दिव्य सानिध्यात तसेच वैदिकत्व विद्वान चेतन गुरुजी आणि शिष्यवृंद विरापूर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून या नुसार मंगळवार दि. 14- रोजी श्री महागणपती गृहप्रवेश, दुपारी 3-41 ते 5-11 पर्यंत भव्य मिरवणुकिने कडोलकर गल्ली श्री बसवेश्वर देवस्थानमध्ये मूर्तीचे आगमन झाले. गुरुवार दि. 16 रोजी सायं. 6 वा महागणपती मुर्तीची ” धान्यादीवास विधी, होणार आहे. शनिवार दि. 18 रोजी सायं. 7.00 वा. पुष्पाधिवास विधी होतील.
मंगळवार दि. 21 रोजी सकाळी 6.00 वा. ब्राम्ही मुहुर्तावर गंगापुजा, गोपूजा, कलश कुंभ मेळ, कडोलकर गल्ली येथील श्री बसवेश्वर देवस्थानमधून बाजार पेठ श्री बसवेश्वर देवस्थान पर्यंत महागणपती विग्रहाची मिरवणुक, द्वारपूजा, प्रदेश वली, आलय प्रवेश, गणपती पुजा, पुण्याहवाचन, गणहोम, वारहोम, सायंकाळी 6.00 वा. उमामहेश्वरादी कार्यक्रम होणार आहेत.
बुधवार दि. 22 रोजी सकाळी 5.00 वा. ब्राम्ही मुहुर्तावर श्री महागणपती रुद्राभिषेक, दुर्वाष्टोत्तर, श्री महागणपतीची प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण, महागणहोम रूद्रहोम, प्रायशचित होम, पुर्णाहुती, महामंगळारती, तिर्थ प्रसाद होणार आहे.गुरुवार दि. 23-3-2023 रोजी रूद्राभिषेक आणि महाप्रसाद फोन उत्सवाची सांगता होईल तरी याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.