खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यात गेल्या 2005 पासून आपण झालेल्या खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे कार्य कौतुकास्पद आहे. गेल्या वीस-बावीस वर्षात अखंडपणे या संघटनेने कुस्ती आखाडे भरवून खानापूरच्या लाल मातीला उभारी दिली आहे. सातत्याने अनेक देणगीदारांच्या सहकार्यातून तसेच कुस्ती शौकिनांच्या मदतीतून हा कुस्ती आखाडा अविरतपणे भरवण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नेहमी प्रयत्न करत आले आहेत अनेक वेळा संघटनेत मतभेद आले पण ते मतभेद बाजूला करून संघटनेला अवकळा येणार नाही याची काळजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच संघटनेतील जेष्ठ कुस्ती शौकिनानी घेतली आहे. अशाच प्रकारे मागील वर्षे देखील चांगला आखाडा भरून या संघटनेने एक आदर्श निर्माण केला असून असेच कार्य या संघटनेने अनेक देणगीदारांच्या सहकार्यातून अविरत ठेवावे याला आपला नेहमी पाठिंबा असेल असे उद्गार माजी आमदार तसा तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. शुक्रवारी खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने वार्षिक अहवाल वितरण तथा नवीन आखाडा भरवण्यासंदर्भात नियोजन या संदर्भात एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बामणे होते.
प्रारंभी उपस्थिताचे स्वागत संघटनेचे संघटक तसेच माजी उपसभापती मल्लाप्पा मारीहाळ यांनी केले प्रस्तावना संघटक प्रकाश मजगावी यांनी केले. त्यानंतर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, माजी उपसभापती सुरेश देसाई, माजी सभापती सयाजी पाटील आदींनी या संघटनेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी अखिल भारतीय कुस्ती संघटनेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष हनुमंत गुरव, संघटनेचे सचिव शंकर पाटील यांनी संघटनेच्या कार्याबद्दल व आगामी आखाडा भरवण्यासंदर्भात तालुक्यातील देणगीदारानी व लोकप्रतिनिधींनी सहकार्याची भूमिका कायम ठेवावी अशी विनंती व्यक्त केली. तसेच मार्च अखेरपर्यंत यावर्षीचा आखाडा भरवण्यात साठी संघटनेकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितल. यावेळी व्यासपीठावर खानापूर तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी राजकीय प्रतिनिधी पत्रकार मंडळी तसेच येळूर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ 2005 ರಿಂದ ಸ್ಥಾಪಿತವಾಗಿರುವ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ ಕುಸ್ತಿಗೀರ ಸಂಘಟನೆಯ ಕಾರ್ಯ ಶ್ಲಾಘನೀಯ. ಕಳೆದ ಇಪ್ಪತ್ತೆರಡು ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಈ ಸಂಸ್ಥೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಕುಸ್ತಿ ಅಖಾಡಗಳನ್ನು ತುಂಬಿ ಖಾನಾಪುರದ ಕೆಂಪು ಮಣ್ಣನ್ನು ಕಟ್ಟಿದೆ. ಹಲವಾರು ದಾನಿಗಳ ಬೆಂಬಲ ಮತ್ತು ಕುಸ್ತಿ ಅಭಿಮಾನಿಗಳ ಸಹಕಾರದಿಂದ ಸಂಸ್ಥೆಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಈ ಕುಸ್ತಿ ಅಖಾಡವನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ತುಂಬಲು ಪ್ರಯತ್ನಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರ ಬ್ಯಾಂಕ್ ನಿರ್ದೇಶಕ ಅರವಿಂದ ಪಾಟೀಲ ಮಾತನಾಡಿ, ಈ ಸಂಸ್ಥೆ ಹಿಂದಿನ ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ರಂಗವನ್ನು ತುಂಬುವ ಮೂಲಕ ಆದರ್ಶವನ್ನು ಮೂಡಿಸಿದ್ದು, ಹಲವಾರು ದಾನಿಗಳ ಸಹಕಾರದಿಂದ ಈ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಸದಾ ಬೆಂಬಲ ನೀಡುತ್ತೇವೆ ಎಂದರು. ಶುಕ್ರವಾರ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ ಕುಸ್ತಿಗೀರ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ವಾರ್ಷಿಕ ವರದಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ಹೊಸ ರಂಗ ತುಂಬುವ ಯೋಜನೆ ಕುರಿತು ವಿಶೇಷ ಸಭೆ ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿತ್ತು.