
रेल्वे भुयारी पुलाच्या कामाचा परिणाम : मनतुर्गा -असोगा मार्गाचा वापर! गावात रहदारीची कोंडी!
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
मणतुर्गा रेल्वे फाटकाजवळ भुवारी पुलाचे काम सुरू असल्याने खानापूर-हेमाडगा मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १० जानेवारी रोजी बजावला होता. त्याच्या अंमलबजावणीला मंगळवारपासून (दि. ४) सुरुवात करण्यात आली. हा रस्ता २२ मार्चपर्यंत रहदारीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे, स्थानिकांना दुचाकी, चारचाकींसाठी आता असोगा मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
मिरज-लोंढा रेल्वे लाईनवरील एल. सी. गेट क्र. ३५६ वर भुयारी पुलाचे काम सुरु आहे. गेल्या वर्षभरापासून मणतुर्गा रेल्वे फाटकाजवळ भुयारी पुलाचे काम संथगतीने सुरु आहे. त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यासाठी दोन्ही बाजूची रहदारी पूर्णपणे बंद करण्याचे आदेश बजाविण्यात आले आहेत. पुलाच्या कामाला रस्त्यावरीलरहदारीचा अडथळा होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, वाहनचालकांना आता खानापूरहून थेट हेमाडगामार्गे गोव्याला जाता येणार नाही.
तथापि, असोगामार्गे जाताना वाटेतील मणतुर्गा तलावाच्या पुलावरील बांधावर अरुंद रस्ता आहे. या रस्त्यावरून एकावेळी एकचचारचाकी जाऊ शकेल इतकी जागा आहे. मुख्य रस्ता बंद झाल्याने या मार्गावरुन वाहनांची वर्दळ वाढल्याने सध्या या तलावावर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
अवजड वाहने बंद करा: काँग्रेस नेते ईश्वर बोबाटे
मणतुर्गा ग्राम पंचायत आणि खानापूर पोलिसांनी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी या मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवून रोज निर्माण होणारी रहदारीची कोंडी दूर करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.त्रास सहन करावा लागत आहे. ट्रक व अवजड वाहनांना असोगा मार्गावरुन बंदी घालण्यात यावी. तसेच अवजड वाहनांना रामनगर अथवा जांबोटीमार्गे जाण्याची सक्ती करण्यात यावी.
- मणतुर्गा वादावादीचे प्रकार
असोगामार्गे मणतुर्गा गावातून असलेला रस्ता अतिशय अरुंद आहे. दोन चारचाकी वाहने एकाचवेळी या रस्त्याने ये-जा करू शकत नाहीत. त्यात सध्या ऊस वाहतूक सुरू आहे. हेमाडगा, अनमोड, शिरोली भागात जाणाऱ्या बस याच मागनि जात आहेत. त्यामुळे, मणतुर्गा गावात रहदारीची कोंडी निर्माण होत आहे. गाडी मागे घेण्याच्या कारणावरून चालकांमध्ये मंगळवारी दोनवेळा वादावादीच्या घटना घडल्या