खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
खानापूर को ऑप बँक ही शतकोत्तर गाठलेली बँक खानापूर शहराचाच नव्हे तर तालुक्याचा मानबिंदू आहे. गेल्या शंभर वर्षांत या बँकेने अनेक वेळा सर्वसामान्यांच्या आर्थिक पाठीशी राहून सावकारशाहीच्या जोखंडात राहणाऱ्या लोकांना सावरणारी बँक ठरली. या बँकेच्या प्रगतीसाठी अनेकांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे आज कोट्यावधीची उलाढाल करत आधुनिकतेची जोड या बँकेने सादर प्रगतीचे एक पाऊल मागील पाच वर्षात साधले आहे. सहकार क्षेत्रात बँक किंवा सोसायटी जगणे काळाची गरज आहे. संस्थेच्या प्रगतीच्या वेळी अनेक निर्णय घेताना सहकार्यकत्याचे क** निर्बंध मार्गकृत करून जाताना संचालक मंडळाला कसरत करावी लागते. हे मलाही ज्ञात आहे. अशा या बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या 12 जानेवारीला होऊ घातले आहे. वास्तविक या संस्थेची निवडणूक बिनविरोध होऊन संस्थेच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने सहकार्य करणे गरजेचे ठरते ,पण सहकार क्षेत्र म्हणजे राजकारण आलेच. त्यामुळे या संस्थेची दुरंगी लढत सुरू आहे. या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान संचालक मंडळ श्री अमृत शेलार यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल निवडणूक लढवत आहे. या मंडळांनी मागील कार्यकाळात केलेले प्रगतीचे पाऊल हे अभिनंदनही असल्याने या संचालक मंडळाच्या पाठीशी सर्व भागधारक सभासदांनी उभे राहून निवडून आणावे असे आवाहन माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी खानापूर लाईव्ह शी बोलताना केले.
गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मी एका सहकार क्षेत्रात काम करत असताना सहकार खात्याचे जाचक नियम म्हणजे दुतोंडी सापासारखी आहे. अलीकडच्या काळात सहकार क्षेत्र सांभाळणे ही तारेवरची कसरत बनली आहे. अशा परिस्थितीत मागील पाच वर्षांमध्ये या संस्थेच्या विद्यमान संचालकांनी केलेले काम हे संस्थेच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून एक अग्रेसर पाऊल म्हणावे लागेल. या संस्थेचे अनेक भागधारक ,ठेवीदार, कर्जदार आहेत या सर्वांचे हित लक्षात घेता विद्यमान चेअरमन अमृत शेलार यासह सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत ते सर्व नवीन जुने उमेदवार हे जाणते आहेत. त्यामुळे या बँकेच्या उत्तरोत्तर प्रगतीच्या दृष्टिकोनातून अनुभवी व जुन्या लोकांना यामध्ये पुन्हा संधी देणे अत्यंत गरजेचे ठरते. यासाठी या बँकेच्या निवडणुकीसाठी पात्र असलेल्या जवळपास 1900 मतदारांनी या संस्थेचे हित लक्षात घेता तसेच संस्थेला अधिक आधुनिकतेची जोड, संस्थेचा विस्तार होईल या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या संचालक मंडळाला निवडून देणे जबाबदारी ठरते. या बँकेवर परस्पर विरोधी दोन पॅनल झाले आहेत सहकार पॅनलच्या माध्यमातून काम करणारी विद्यमान संचालक मंडळी ही अनुभवी त्याचप्रमाणे या संस्थेच्या प्रगतीत निरंतर विचार करणारे असल्याने मतदान आणि देखील याचा सारासार विचार करून अमृत शेलार यांच्या नेतृत्वाखालील या सहकार पॅनलला सहकार्य करावे व भरगोस मतांनी निवडून आणावे असे आवाहन त्यांनी केले आहे.