खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी!
खानापूर येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नवरात्रीनिमित्त सुरू असलेल्या दुर्गामाता दौडच्या तिसऱ्या दिवशीही उदंड प्रतिसाद मिळाला. या दौंडचे धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे युवा युवतीनी मोठा सहभाग घेतला होता. प्रथे प्रमाणे शिवस्मारक आवारातील छत्रपती शिवरायांना अभिवादन करून सुरुवात केली जाते. यानुसार मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन झाल्यानंतर आश्रय कॉलनी, वर्दे कॉलनी, गणपती मंदिर, हायवे बसवेश्वर स्मारक, शिवाजी नगर, समर्थ नगर,श्री मर्यांमा मंदिर, गांधीनगर, श्री दुर्गादेवी मंदिर, श्री विठ्ठल रुक्माई मंदिर येथून हलकर्णी येथे सांगता करण्यात आली. यावेळी एपीएमसी सदस्य मारुती गुरव, विनय कदम यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या या दुर्गा दौडला दरवर्षीप्रमाणे यावर्षी उदंड प्रतिसाद मिळाला.
बुधवारचा मार्ग….
बुधवारी शिवस्मारक चौकापासून सुरू होणारी ही दुर्गादेवी दौडरूमेवाडी क्रॉस, मलाप्रवा नदी पूल, मारुती नगर, सातेरी माऊली मंदिर, बेंद्रेखुट, गुरव गल्ली, घाडी गल्ली, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक व श्री बसवेश्वर मंदिर, बाजारपेठ नगर खाना येथून श्री रवळनाथ मंदिर येथे सांगता होणार आहे.