IMG-20250112-WA0005

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: खानापूर येथील कोऑप बँकेची पंचवार्षिक निवडणूक आज रविवारी दिवसभर चुरशीने सुरू झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत सदर मतदान प्रक्रिया चालणार आहे. वास्तविक मतदान प्रक्रिया संपताच मतमोजणी होऊन निकाल जाहीर करणे क्रमप्राप्त असते. मात्र या बँकेवर एक न्यायालयीन दावा असल्याकारणाने आज होणाऱ्या मतदानाचा निकाल लांबणीवर पडला आहे. त्यामुळे विद्यमान उमेदवारांसह सभासद व तालुक्यातील जनतेचा मोठा हिरमोड झाला आहे. या संदर्भात निवडणूक प्रक्रियेचे रिटर्निंग ऑफिसर रवींद्र पाटील यांनी न्यायालयीन अडचणीमुळे आज निकाल दिला जाणार नाही ज्या दिवशी न्यायालयीन निर्णय होईल त्या दिवशी या मतदान प्रक्रियेचा निकाल होईल असे खानापूर लाईव्ह शी बोलताना सांगितले.

या बँकेची पंचवार्षिक निवडणूक चुरशीने सुरू आहे. सत्ताधारी सहकार पॅनल विरुद्ध विकास पॅनल अशा दोन गटांमध्ये या निवडणुकीत उमेदवार रिंगणात उभे आहेत. या निवडणुकीत एकूण 28 उमेदवार रिंगणात असून दोन्ही पॅनल कडून प्रत्येकी 13 प्रमाणे उमेदवार उभे असून आज दिवसभर मतदारांच्याकडे मत याचना करण्यासाठी मतदान केंद्रावर ठाण म्हणून उभे होते. रखरखत्या उन्हातही आज दिवसभर जुन्या मोटर स्टॅन्ड जवळील समर्थ स्कूल जवळ आज मतदारांची तसेच सभासदांची एकच गर्दी झाली होती. या बँकेच्या निवडणुकीत एकूण प्राथमिक टप्प्यात 1921 मतदार होते. मात्र ऐनवेळी दोन्ही गटांनी या ठिकाणी मतदारांची पात्र संख्या वाढवून आणली. त्यामध्ये एका गटाने 520 तर दुसऱ्या गटाने 420 असे मतदार वाढवून आणल्याने एकूण 2865 मतदार या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र सायंकाळी चार पर्यंत यापैकी किती टक्के मतदान होणार याचा आकडा चार नंतर मिळणार आहे. एकूणच आज चुरशीने होत असलेल्या या निवडणुकीच निकाल मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबणीवर पडला आहे. या या गोवा बँकेवर सध्या अमृत शेलार यांच्या नेतृत्वाखाल सत्ता आहे. मागील नोकर भरतीच्या निवडीनंतर माहिती हक्क कायद्याखाली एका उमेदवाराने न्यायालयीन दावा खोकल्याने या निवडणुकीचा निकाल मात्र आता लांबणीवर पडला आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us