- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- प्रतिवर्षीप्रमाणे खानापुर श्री चव्हाटा देवस्थान, निंगापूर गल्ली येथे सोमवार दि. 11-12 2023 रोजी श्रींचा कार्तिकोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्तिकोत्सवाच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून ही रांगोळी स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहे.
- पहिला गट पहिली ते सातवीसाठी असून यासाठी पहिले बक्षीस रुपये 1001, दुसरे 501, तिसरे 251अशी अशी आहेत. दुसरा गट इयत्ता आठवी ते वरील वयोमर्यादेसाठी असून यासाठी पहिले बक्षीस रुपये 1501, दुसरे 1001, तिसरे 501 अशी आहेत.
- उपरोक्त सर्व बक्षिसे प्रभाग क्र. 7 चे नगरसेवक विनायकराव सुरेश कलाल यांच्या सौजन्याने ठेवण्यात आली आहेत. स्पर्धा संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. रात्री 10 वाजता स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी भाग घ्यावा व स्पर्धा यशस्वी करावी. त्याचबरोबर गल्लीतील समस्त नागरिकांनी श्री कार्तिकोत्सवात भाग घेऊन श्रींच्या प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन
- श्री चव्हाटा देवस्थान संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
- निंगापूर गल्ली, खानापूर.