IMG-20241230-WA0024

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:

नंदगड विभागीय ज्ञानयज्ञ किर्तन सोहळा कार्यक्रम कसबा नंदगड येथील पोलीस ठाण्याच्या परिसरात सोमवारी पार पडला. यावेळी ते उद्घाटक या नात्याने बोलत होते. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपाचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार विठ्ठल हलगेकर माजी आमदार अरविंद पाटील ,भाजपा नेत प्रमोद कोचेरी, संजय कुबल, मार्केटिंग सोसायटीचे संचालक पी एच पाटील, उद्योजक अशोक गोरे, माजी जिल्हा पंचायत सदस्य ज्योतिबा रेमानी, ग्रामपंचायत अध्यक्ष नेत्रा लोहार ,उद्योजक प्रशांत लकेबैलकर यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना माजी आमदार अरविंद पाटील यांनी अध्यात्मसेवा हा जीवनाचा पैलू असून सुखी जीवनासाठी प्रत्येकाने या क्षेत्रात वळले पाहिजेत. खानापूर तालुक्यात अनेक युवा कीर्तनकार घडत आहेत. त्या कीर्तनकारांना घडवण्यासाठी अशा संत साहित्याच्या चळवळीसाठी झटले पाहिजे. युवा कीर्तनकार विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक युवा वर्ग भजन कीर्तन नामस्मरणात कार्यरत आहेत हे कौतुकास्पद असून अशा गोष्टींना वाव देणे काळाची गरज असल्याचे महत्त्व त्यांनी यावेळी सांगितले. युवा कीर्तनकार विठ्ठल पाटील यांनीही यावेळी विभागीय कीर्तन सोहळा आयोजित करून केवळ युवा वर्गाला या वारकरी संप्रदायास प्रेरित करण्याचा मुख्य हेतू असून यामध्ये सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाला अनेक मान्यवर वारकरी मंडळी उपस्थित होती. दिवसभरात अनेकांचे कीर्तन नामस्मरण भजन पार पडले. रात्री सात वाजता युवा कीर्तनकार विठ्ठल पाटील यांच्या कीर्तन सोहळ्यानंतर या उत्सवाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमात सूत्रसंचालन सुहास पाटील यांनी केले तर आभार शिक्षक ह भ प एस. टी. पाटील यांनी मांडले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us