
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यातील कारलगा, कारलगा हट्टी येथील ग्रामदैवत श्री चव्हाटेश्वर महाराज देवस्थान चा वार्षिक उत्सव सोहळा व ग्रामदैवत श्री सातेरी माऊली यात्रा उत्सव उद्या सोमवार दि. 12 मे पासून प्रारंभ होत आहे. या यात्रेचा मुख्य दिवस बुधवार दि. 14 मे राहणार आहे. या निमित्ताने उद्या सोमवार दि. 12 रोजी ग्रामदैवत श्री चव्हाटेश्वर देवस्थानचा वार्षिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दि. 13 मे रोजी ग्रामदैवत श्री सातेरी माऊली देवीची महापूजा व देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम दिवसभर चालणार आहे. दुपारी देवीला मान देण्याचा कार्यक्रम होईल. बुधवार दि. 14 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेस श्री सातेरी माऊली देवस्थान चा सामूहिक महाप्रसाद होणार आहे. यानिमित्ताने बुधवार दि. 14 रोजी सायंकाळी भजनी भारुड चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंदिर परिसरात मिठाई, खेळण्याची दुकानेही थाटण्यात आली आहेत. तीन वर्षातून होणारा हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षीही याची येथील पंच कमिटीने तयारी केली आहे. तरी सार्वजनिकानी या त्रैवार्षिक उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.