Oplus_16908288

Oplus_16908288


खानापूर : तालुक्यातील मौजे कारलगा हट्टी येथे रविवार दि. 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता स्वयंभू श्री ब्रह्मदेव मंदिरात गाभारा चौकट पूजन तसेच मंदिर वास्तुशांती, तसेच गावातील माहेरवासीनींचा हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमानिमित्त गावातील मान्यवर, महिला भगिनी, ग्रामस्थ तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मंदिर परिसरात विविध पूजन विधी, धार्मिक कार्यक्रम आणि भक्तिमय वातावरणात सोहळा पार पडणार आहे.
कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. आयोजकांनी सर्व ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.
श्री स्वयंभू ब्रह्मदेव मंदिर जिर्णोद्धार समिती, पंच मंडळी व ग्रामस्थ कारलगा हट्टी यांच्या वतीने सर्वांना सस्नेह निमंत्रण देण्यात आले आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us