- खानापूर लाईव्ह न्युज / कणकुंबी
- बेळगाव शहापूर येथील माहेश्वरी युवा संघ यांच्या आर्थिक सहकार्याखाली कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयाच्या हॉलचे नुतनीकरण नुकताच करण्यात आले.तसेच विद्यालयाला माहेश्वरी युवा संघाच्या नेतृत्वाखाली तीस बेंचीस देण्यात आले.त्यानिमिताने उद्घाटन व बेंचीस सुपूर्द असा संयुक्त समारंभ पार पडला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व विश्व भारत सेवा समितीचे संस्थापक गुरूवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी होते.
- सन २००४ मध्ये बांधण्यात आलेल्या कणकुंबी हायस्कूलच्या सभागृह वजा वर्ग खोलीचे छप्पर मोडकळीस आले होते. सदर हॉलच्या नूतनीकरणाचा संकल्प मुख्याध्यापक एस.जी चिगुळकर यांनी केला होता.त्यानुसार बेळगावचे कंत्राटदार व सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू डागा यांनी आपल्या माहेश्वरी युवा संघ संस्थेमार्फत व बेळगाव मधील अनेक दानशूर व्यक्तीकडून आर्थिक सहकार्य सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.त्यानुसार माहेश्वरी युवा संघाच्या नेतृत्वाखाली बेळगाव उद्यमभाग येथील नामांकित अशा बेम्को इंडस्ट्रीजचे मालक यशवंत मोहता यांनी कै. हरिकिशनची मोहता यांच्या स्मरणार्थ हॉलच्या शेड उभारणीसाठी लागणारी आर्थिक मदत केली.तसेच पीव्हीजी ग्रुपचे मालक असलेले प्रसन्ना घोडगे यांच्याकडून विद्यालयासाठी 30 बेंचीस देणगी दाखल देण्यात आले. त्यामुळे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन बेम्को जॅकिंग सिस्टीम प्रा.लि. मालक यशवंत मोहता यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
- याप्रसंगी माहेश्वरी युवा संघाचे अध्यक्ष राहुल मुंडरा, सेक्रेटरी हरीश बंग,उपाध्यक्ष गौतम चिंडक,तसेच संघाचे माजी अध्यक्ष मधुसूदन भंडारी,मधुसूदन तपाडिया,सचिन हेडा,नवनीत हेडा,अभिमन्यू डागा हायकोर्टचे वकील कृष्णकुमार जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
- मुख्या. एस जी चिगुळकर यांनी विद्यालयाच्या वतीने माहेश्वरी युवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.यावेळी माहेश्वरी युवा संघाकडून विद्यालयाच्या विकासासाठी यापुढेही आर्थिक सहकार्य करण्याची ग्वाही दिली.याप्रसंगी श्री माऊली देवी विश्वस्त मंडळाचे सचिव लक्ष्मण गावडे व पालकवर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन एन.एस करंबळकर यांनी केले तर एस आर देसाई यांनी आभार मानले.