खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: बेळगाव येथील आपटेकर स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित बेळगाव रण हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तोपिन कट्टी चे कल्लाप्पा तिरविर यांनी घवघवीत यश संपादन केले आहे त्यांनी 46 ते 99 वर्षे वयोगटांमध्ये मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावत द्वितीय क्रमांक पटकावला आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ही स्पर्धा रविवारी बेळगाव जिल्हा क्रीडांगण या ठिकाणी प्रारंभ झाली यामध्ये 10 किलोमीटर 5 किलो मीटर व 3 किलोमीटर अशा तीन गटांमध्ये 15.ते. 30 , 31ते. 45 ,व 46 ते 99 अशा तीन गटांमध्ये या स्पर्धा होत्या
या स्पर्धेमध्ये बेंगलोर म्हैसूर मंगळूर गोवा महाराष्ट्र आर्मी सैनिक स्कूल सह विविध जिल्ह्यांतील व विविध राज्यातील जवळपास एक हजारहून अधिक स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. सुनील आपटेकर फाउंडेशन यांचा मुख्य हेतू शरीर सुदृढ व्हावे व उत्साह आनंद मिळण्यासाठी व्यायामाचा सराव करावा या उद्देशाने ही स्पर्धा दरवर्षी घेण्यात येत असते
श्री कल्लाप्पा तिरवीर हे वयाच्या दहा वर्षापासून आजपर्यंत सातत्याने सराव करत देश विदेश स्पर्धामध्ये सुवर्णपदक अनेक वेळा प्राप्त केलेले आहे. आजही नियमित 20 किलोमीटर रनिंग सराव कोल्हापूर येथे करत असतात. आज स्वतःचा व्यवसाय सांभाळत अशा सर्व स्पर्धांमध्ये त्यांनी आपले वर्चस्व टिकविले आहे. सातत्याने सराव केल्याने असाध्य गोष्ट साध्य करता येते याचे मार्गदर्शन प्राथमिक शाळा हायस्कूल आणि आज आंतरराष्ट्रीय कोच यांचे मार्गदर्शन व स्थानिकांची प्रेरणा घेऊन तरुणाला लाजवेल असे कार्य त्यांच्याकडून नेहमी घडत असते हा आदर्श आपल्या बेळगाव जिल्ह्याने राज्य व देशाने घ्यावा अशी त्यांचे कार्य होत आहे. गर्लगुंजीचे श्री एल जी कोलेकर ज्येष्ठ कोच यांचे मार्गदर्शन लाभत आहे.