खानापूर/ प्रतिनिधी: खानापूर तालुक्यात पुरातन लोककलांना जागृती देत एक उत्तम कलावंत तसेच कलाकुसरतेचा अभ्यासक लोककलावंत अभिजीत द, कालेकर यांना तेजस फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार 2023 ने 22 जून रोजी छ, संभाजी नगर ( औरंगाबाद) येथे सन्मानित करण्यात आले.
अभिजीत कालेकर हे एक खानापूर तालुक्यातील उत्तम कलाकार आहेत. मराठी लोक संस्कृतीची जोपासना, त्यासाठी केलेलं कार्य आणि कलेच्या सांस्कृतीक कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्या प्रसंगीप्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री प्रा, बापू देसाई सर, नाना चव्हाण, सा, कार्यकर्त्या रंजीता तोर, तेजस च्या अध्यक्षा सौ,मेघा डोळस, महेंद्र तुपे, निवेदक पंकज शिंदे, प्रा, अजिंक्य लिंगायत, इत्यादी उपस्थीत होते. त्यांना या मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.