- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधि: गर्ल गुंजी येथील ज्युडो पट्टू रोहिणी पुंडलिक पाटील हिने म्हैसूर दसरा आणि 12वी वरिष्ठ राष्ट्रीय स्तरावरील कुराश चॅम्पियनशिप छत्तीसगड या दोन्ही ठिकाणी सुवर्ण पदक पटकावून तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. या तिच्याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे .
- गर्लगुंजी गावची सुकन्या ज्युडो पट्टू रोहिणी पाटील हिने म्हैसूर दसरा स्पोर्ट ज्युडो प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केलेले आहे. त्याच बरोबर 12वी वरिष्ठ राष्ट्रीय स्तरावरील कुराश चॅम्पियनशिप छत्तीसगड येथे ही ज्युडो प्रकारात सुवर्ण पदक मिळवलेले आहे. यापूर्वी ही रोहिणी पाटील हिने राज्य आणि देश पातळीवरील विविध स्पर्धा मधे ज्युडो प्रकारात भाग घेऊन गोल्ड,सिल्व्हर आणि ब्राँझ मेडल मिळवलेले आहेत. हलाखीच्या परिस्थितीतून ती जिद्दीने, कष्टाने इथ पर्यंत पोहचलेली आहे.या विजयामुळे रोहिणी पाटील हीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. गर्लगुंजी तसेच खानापूर तालुक्याचे नाव तिने उज्वल केलेले आहे. तिला जितेंद्र सिंग आणि ओमकार मोटार यांचे प्रशिक्षण लाभत आहे.त्याच बरोबर वडील पुंडलिक पाटील यांचे सहकार्य त्यांना मिळत आहे.