Screenshot_2023_0410_142052


खानापूर /प्रतिनिधी: खानापूर तालुक्यात निधर्मी जनता दलाचे अधिकृत उमेदवार म्हणून नासिर बागवान यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांनी प्रचारकार्याला सुरुवात केले आहे. हे जरी खरे असले तरी नासिर बागवान हे जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता आपल्या भोवतालच्या व संबंधितांनाच घेऊन काम करत आहेत. त्यामुळे खानापूर तालुक्यातील हिंदू धर्मातील अनेक निधर्मी जनता दलाचे कार्यकर्ते नाराज आहेत याबाबत निजदचे उमेदवार नासिर बागवान यांनी वेळीच दखल घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे, अन्यथा पक्षाच्या अनेक निष्ठावंतांना वेगळाच मार्ग अवलंबावा लागेल,असा इशारा एका पत्रकार परिषदेद्वारे निजद नेते रेवणसिद्धया हिरेमठ यांनी सोमवारी बोलवलेल्या एका पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी ते म्हणाले, माझ्यासह अनेक कार्यकर्ते गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून निधर्मी जनता दलाचे निष्ठावंत कार्यकर्ते व राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून काम करत आले आहेत. मागील निवडणुकीत त्यांना 28 हजाराचे मताधिक्य मिळवण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी काम केले आहे. असे असताना सध्याच्या निवडणुकीत आपणच सर्वेसर्वा, आपणच पक्षाचे अध्यक्ष, आपणच सर्व काही करणार असे समजून आपल्याच समाजातील लोकांच्यावर अध्यक्षपदापासून सर्व जबाबदाऱ्या देऊन ते हिंदू धर्मियांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे हिंदू धर्मातील अनेक निधर्मी जनता दलाचे सक्रिय कार्यकर्ते बागवान यांच्या कार्याबद्दल विरुद्ध नाराज आहेत. यासाठी खानापूर तालुका निधर्मीय जनता दलाची एक व्यापक बैठक बोलावून सर्वसमावेशक निवडणूक कार्य हाती घेऊन तालुक्यात निधर्मी जनता दलाची निवडणूक लढवावी, तसे न झाल्यास तालुक्यातील अनेक हिंदू धर्मीयासह इतर समाजातील काही लोक निधर्मी जनता दलातून बाहेर पडून अन्य पक्षाचा विचार करतील. असा इशारा रेवन सिद्धया हिरेमठ यांनी यावेळी दिला आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us