बेळगाव : भारतीय सेनेत गेली 8 वर्ष सेवा बजावत असताना या वर्षी आपण सप्तपदी ( विवाह बंधनात)पाऊल टाकण्याच्या उद्देशाने सुट्टीवर गावाकडे येणाऱ्या एका जवानाचा रेल्वेतून पाय घसरून वाटेतच मरणाच्या दारात पाऊल पडल्याची घटना गोकाक तालुक्यातील एका जवानाच्या बाबतीत घडली.
याबाबत मिळालेली माहिती की, बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात असलेल्या कणसगिरी गावातील जवान काशिनाथ शिंदगिरी व 28 असे या दुर्दैवी जवानाचे नाव आहे. सदर युवक गेल्या अनेक वर्षापासून भारतीय सेनेत सेवा बजावत आहे. यावर्षी विवाह बंधनात अडकण्यासाठी गावाकडे सुट्टीवर येत होता. पंजाब लुधियाना येथून रेल्वेने येत असताना त्याचा पाय घसरून तो खाली पडला व त्याचा मृत्यू झाला. असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. याचा रेल्वे पोलिसांनी तपास जारी केला आहे.
या जवानाच्या अकाली निधनामुळे कणसगिरी गावात एकच शोककळा पसरले असून वीर जवानाचा पार्थिव शनिवारी गावात आणण्यात आला. व लष्करी इतमामात व शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.