खानापूर /प्रतिनिधी: कर्नाटक विधानसभेच्या 2023 च्या निवडणुकीचे रणांगण सुरू आहे. अनेक राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष या निवडणुकीमध्ये रिंगणात उभे आहेत. यामध्ये कर्नाटकात गेल्या 47 वर्षापासून सक्रिय असलेल्या व कर्नाटकात तीन वेळा विधानसभेवर वर्चस्व साधून सत्ता स्थापन केलेल्या ‘जनता पार्टी कर्नाटक’ या पक्षाने संपूर्ण कर्नाटकात निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. या अनुषंगाने खानापूर तालुक्यात विधानसभा मतदारसंघात जनता पार्टी कर्नाटक या पक्षाचा नांगरधारी शेतकरी या चिन्हावर उमेदवार या वर्षीच्या मतपत्रिकेत राहणार आहे. याकरिता खानापूर तालुक्यातून या पक्षाचे अधिकृत उमेदवार निश्चित करण्यात आले असल्याची माहिती ‘नांगरधारी शेतकरी’ चिन्ह असलेल्या ‘जनता पार्टी कर्नाटक’ या पक्षाचे राज्य प्रधान कार्यदर्शी नागेश. एन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी पत्रकाराशी बोलताना इच्छुक उमेदवार श्री शंकर कुरूमकर म्हणाले, खानापूर तालुक्यात जनता पार्टी कर्नाटक या पक्षाचे जुने अनेक कार्यकर्ते आहेत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय रामकृष्ण हेगडे यांना मानणारा समाज व मतदार या तालुक्यात आहे. त्यामुळे स्वर्गीय रामकृष्ण हेगडे व त्यांच्या राजकीय कार्य काळातील विकास कामे व त्यांनी केलेल्या योजना बद्दल जन माणसात जागृती करून जनता पार्टी कर्नाटक या पक्षाला निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री शंकर कुरुमकर अधिकृत उमेदवार

खानापूर विधानसभा मतदारसंघात जनता पार्टी कर्नाटक या पक्षाच्या ‘नांगरधारी शेतकरी’ चिन्हावर गंगवाळी येथील शंकर व्हन्नाप्पा कुरुमकर यांना अधिकृत उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. शंकर कुरुमकर हे खानापुरातील एक उत्तम व्यावसायिक म्हणून परिचित आहेत. गावातील सामाजिक कार्याबरोबर त्यांच्या गाव भागामध्ये ही त्यांनी समाजसेवेत नेहमी कार्यरत असतात. माहितीसाठी Mo no 9164777089, 8722721574 वर संपर्क साधावा असे आवाहन शंकर कुरुमकर यांनी केले आहे

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us