जांबोटी सोसायटीच्या खानापूर शाखेचा १ जानेवारी रोजी रौप्यमहोत्सव
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यातील पहिली पतसंस्था आणि तालुक्याच्या पश्चिम भागाच्या आर्थिक विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या दि. जांबोटी मल्टिपर्पज को -ऑप. सोसायटी या पतसंस्थेच्या खानापूर शाखेचा रौप्य महोत्सव बुधवार दि. १ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. शाखेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास बेळगावकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, तहसीलदार प्रकाश गायकवाड, बेळगाव जिल्हा उपनिबंधक रवींद्र पाटील यांच्याहस्ते दीप प्रज्वलन होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा को-ऑपरेटिव्ह सोसायटी युनियनचे अध्यक्ष आर. बी. बांडगीे, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी, सीडीओ नवीन हुलकुंद, निवृत्त व्यवस्थापक आर. पी. जोशी, भाग्यलक्ष्मी को ऑप. सोसायटीचे अध्यक्ष ॲड व्ही. एन. पाटील, व्हन्नवादेवी को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला पतसंस्थेचे सदस्य, भागधारक व ग्राहकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.