जांबोटी/प्रतिनिधी: जांबोटी ग्रामपंचायतच्या अध्यक्ष _उपाध्यक्ष पदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. ग्रामपंचायत अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला गटाकरता आल्याने एकमेव असलेल्या लक्ष्मी मारुती तळवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
तर उपाध्यक्ष पदासाठी चुरशीची निवडणूक झाली. या चुरशीच्या निवडणुकीमध्ये आज सकाळपासून ज्यांच्या 46 जन्मदिनाच्या शुभेच्छा होत असतानाच त्यांना उपाध्यक्षपदाची माळ सुनील शंकर देसाई यांना घालून ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांना जणू जन्मदिनाची मोठी भेट दिली आहे.
उपाध्यक्ष पदासाठी चुरशीची निवडणूक ..सत्ताधिकाऱ्यांना दिला धक्का
- ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्ष पदासाठी सामान्यगटाचे आरक्षण आले होते. या सामान्य गटातील उपाध्यक्ष पदासाठी सूर्यकांत तुकाराम साबळे व सुनील शंकर देसाई या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आरक्षण जाहीर झाल्यापासून उपाध्यक्ष पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. यामध्ये सत्ताधिकारी गटातून साबळे यांना उपाध्यक्ष करण्यासाठी मोठे लॉबीनही झाले होते जवळपास 11 सदस्य त्यांच्याच गटात होते पण अनपेक्षित पणे शेवटच्या क्षणी बारा सदस्यापैकी जांबोटी ग्रामपंचायतीच्या 7 सदस्यांनी अनपेक्षितपणे धक्काच दिला. अन् सुनील शंकर देसाई यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्ष पदाचा सन्मान दिला आहे. विशेष म्हणजे सुनील देसाई हे एक उत्तम सामाजिक कार्यकर्ते आहेत. मागील पाच वर्षात त्यांनी ग्रामपंचायतीचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळल्यामुळे पुन्हा त्यांना ग्रामपंचायत सदस्यत्व नागरिकांनी दिले आहे. या निवडणुकीतही सुनील देसाई यांना एकांकिका पाडण्याचा हेतू सत्ताधिकाऱ्यांचा धुळीत गेला आहे केवळ आणि केवळ सुनील देसाई यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर व आपल्या प्रामाणिक पणाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून या निवडणुकीत सहभाग घेतला व इतर सदस्या नाही ग्रामपंचायतच्या विकासाच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन व सर्वांना विश्वासात घेऊन हाती घेतलेली कामे यामुळेच ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सुनील यांच्या योग्यतेची कदर करून त्यांना उपाध्यक्ष पदाची माळ घातली अन् आगामी 30 महिन्याच्या कालावधीसाठी त्यांना एकप्रकारे वाढदिवसाची भेटच दिली आहे.
- या निवडणूक प्रक्रियेत ग्रामपंचायत मावळते अध्यक्ष महेश मारुती गुरव, मावळत्या उपाध्यक्ष मयुरी मारुती सुतार त्याचप्रमाणे विलास नारायण देसाई, लक्ष्मी मल्लाप्पा मादार, प्रवीण प्रभाकर साबळे, अंजना शिवाजी हनबर, अनुराधा नारायण सडेकर, मंजुनाथ ईश्वर मुतगी,अशोक राजाराम सुतार या सदस्यांनी भाग घेतला. निवडणूक अधिकारी म्हणून कळसा प्रकल्पाचे अधिकारी मराठे यांनी काम पाहिले. ग्रामपंचायत विकास अधिकारी सुनील अंबारी यांनी उभयतांचे स्वागत व सत्कार केला. ’यावेळी समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.