खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील अग्रगण्य ग्रामीण पतसंस्था असलेल्या दि.जांबोटी मल्टीपर्पज ऑफ सोसायटीच्या अध्यक्षपदी श्री विलास बेळगावकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी पुंडलिक नाकाडी यांचीही फेरनिवड करण्यात आली आहे. या पतसंस्थेने गेल्या नऊ पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध निवड करून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विलास बेळगावकर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल कायम ठेवले आहे. संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता व सर्व संचालकांना विश्वासात घेऊन भागधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी विद्यमान अध्यक्ष विलास बेळगावकर यांनी अत्यंत मोलाचे कार्य केले आहे त्याला संस्थेचे उपाध्यक्ष व संचालक मंडळांची ही सर्वात महत्त्वाचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे या संस्थेने कायम बिनविरोध निवड करण्याची परंपरा राखली आहे. त्याबद्दल या संस्थेच्या संचालक मंडळाचे अभिनंदन होत आहे. या संस्थेच्या संचालक मंडळात शंकर कुडतरकर (जांबोटी), यशवंत पाटील (ओलमणी), विद्यानंद बनोशी (खानापूर), पुंडलिक गुरव (गोल्याळी), पांडुरंग नाईक (आमटे). पुंडलिक नाकाडी (बेलूर), विलास कृष्णाजी बेळगावकर (कुसमळी), खाचाप्पा काजुनेकर, (ओलमणी), हणमंत काजुनेकर ( जांबोटी), भैरू लागू पाटील (पिरणवाडी), शाहु गुरव (बैतूर), भाऊ कुर्लेकर (जबोटी), भरमाणी नाईक (जांबोटी) तर संचालिका पदी सौ. गीता इंगळे (ओलमणी), सौ. सरस्वती पाटील (जांबोटी) यांची बिनविरोध निवड निवड झाली आहे.
अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर उपस्थित यांचे पुष्पहार घालून संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले यावेळी संचालक मंडळासह गावातील भागधारक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.