- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी निट्टुर येथे शिक्षणप्रेमी नागरिकांकडून तालुक्यातील सरकारी मराठी शाळांच्या विद्याथ्यांना प्रोत्साहन देऊन आपल्या माय मराठी शाळांचे अस्तित्त्व टिकविण्यासाठी देत असलेला हा लढा. शाळा सुधारणा आणि व्यवस्थापन समिती तसेच समस्त निट्टुर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने, पुर्ण प्राथमिक मराठी शाळा निट्टुर येथे खानापूर तालुक्यातील इयत्ता ७ वी पर्यंतच्या प्राथमिक मराठी शाळांच्या विद्याथ्यांसाठी दोन गटात विद्यार्थ्याच्या सुप्त कलागुणांसाठी “जागर प्रतिभेचा” अंतर्गत येत्या शुक्रवार दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ठिक ९-०० वा. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
- सदर स्पर्धा पहिली ते चौथी तसेच पाचवी ते सातवी अशा दोन गटात ठेवण्यात आली आहे. यामध्ये परीक्षा स्वरूपात सामान्य ज्ञान स्पर्धा, भाषण स्पर्धा, श्रुतलेखन स्पर्धा, हस्तकला स्पर्धा अशा चार प्रकारात ठेवण्यात आली आहे.
- सामान्य ज्ञान स्पर्धेत 50 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी वेळ एक तास राहील.
- तर भाषण स्पर्धेत 4थी पर्यंतच्या गटात खेळांचे महत्त्व, मी सैनिक झालो तर.. छत्रपती शिवाजी महाराज.. संस्काराचा एक धडा
- तर पाचवी ते सातवी पर्यंतच्या गटात भारताची अंतराळातील झेप, औद्योगिकीकरणाचे फायदे व तोटे, शेतकरी बाप; जगाचा पोशिंदा हे विषय राहणार आहेत.
- तर इयत्ता चौथी पर्यंतच्या स्पर्धकांसाठी श्रुत लेखन स्पर्धा ठेवण्यात आले असून याकरिता 50 गुणाची परीक्षा राहील
- तर पाचवी ते सातवी पर्यंतच्या गटासाठी निबंध स्पर्धा ठेवण्यात आले असून याकरिता खालील कृषी आधुनिकीकरणाचे फायदे व तोटे, कर्नाटक राज्यातील बेळगाव चे महत्व, भारतीय लोकशाही असे विषय ठेवण्यात आले असून यासाठी एक तासाचा कालावधी देण्यात येणार आहे.
- तर हस्तकला स्पर्धेत दोन्ही गटात स्वखर्चाने स्वतः यंत्राचा किंवा साच्याचा वापर न करता मुक्तपणे हस्तकला करण्याची राहणार आहे.
- या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांसाठी प्रत्येक गटात अनुक्रमे 2001, 1501, एक 1001, 501, 501 अशी आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले असून इच्छुक स्पर्धकांनी 19 नोव्हेंबर पूर्वी आपली नावे नोंद करावीत. स्पर्धेकरिता काही नियम व अटी ठेवण्यात आले असून अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 7259142050 किंवा 7676724392 शी संपर्क साधावा. तरी या स्पर्धेचा खानापूर तालुक्यातील मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी नेहमी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.