खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
मराठी भाषा आणि संस्कृतीयांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी देत असलेला लढा. शाळा सुधारणा आणि व्यवस्थापन समिती, श्री स्वामी विवेकानंद युवक संघ तसेच समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने, पुर्ण प्राथमिक मराठी शाळा निट्टूर ता. खानापूर, येथे खानापूर व बेळगाव तालुक्यातील इयत्ता ७ वी पर्यंतच्या प्राथमिक मराठी शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी दोन गटात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांसाठी जागर प्रतिभेचा हा स्पर्धात्मक कार्यक्रम येत्या शुक्रवार दि.8 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या स्पर्धेत मोठा गट पाचवी ते सातवी तसेच लहान गट पहिली ते चौथी अशा दोन गटात स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. लहान गटाकरिता या दोन्ही गटाकरिता वेगवेगळ्या सामान्य ज्ञान स्पर्धा, भाषण स्पर्धा, श्रुत लेखन स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, ठेवण्यात आल्या असून यासाठी आकर्षक बक्षीसही ठेवण्यात आली आहे. लहान गटासाठी अनुक्रमे प्रत्येक स्पर्धेकरिता 2001 1500,1000,500 अशी तर पाचवी ते सातवी गटाकरिता 2500 ,2000, 1500, 1000 अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्या साठी मराठी लोक नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी अनुक्रमे 4000, 3000 ,2000,1500, 1000 अशी बक्षिसे व आकर्षक चषके ठेवण्यात आले आहेत. यासाठी प्रवेश फी निर्धारित करण्यात आली असून इच्छुक स्पर्धकांनी 5 नोव्हेंबर पूर्वी 7259142050 या क्रमांकाची संपर्क साधून नावे नोंद करावीत अधिक माहितीसाठी 7676724392 क्रमांकाशी संपर्क साधावा. असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.