- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: ज्या शाळेत वाढलो, ज्या शाळेत लहानाचा मोठा झालो आणि ज्या शाळेने शाळेच्या जडणघडणीत बालपण गेले अशा या शाळेतून लहानाचा मोठा होताना मागचे ते दिवस आठवतात. अशा माझ्या अंगी मराठी प्राथमिक शाळेने दिलेले संस्कार घेऊनच तसेच माझे वडील निवृत्त मुख्याध्यापक नारायण पेडणेकर यांनी याच शाळेतून बोट धरून दिलेली दिशा, ही माझ्या आयुष्याला सार्थकी ठरणारी आहे. जीवनात पुढे जाताना अनेक कटू प्रसंग सोसावे लागले. त्यातूनच वाट काढत उच्च शिक्षण घेता घेता आज इस्रो सारख्या वैज्ञानिक क्षेत्रात काम करताना आनंद होतो. असे सांगून आपल्या जीवनातील विविध घटना आणि प्रसंग आपल्यासाठी कसे मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत गेले. त्याचप्रमाणे अनगडी ते इस्त्रो या प्रवासाबद्दल माहिती सांगितली. त्याचबरोबर चंद्रयान-2 आणि चंद्रयान-3 मध्ये त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवली होती त्याबद्दलही त्यांनी माहिती दिली. आपणाला माया मातीच्या गोळ्यातून घडवलेल्या शाळेने तसेच येथील शाळा कमिटी व ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञ झालो असे विचार इस्त्रो शास्त्रज्ञ प्रकाश पेडणेकर यांनी नुकताच आनगडी येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळा व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात व्यक्त केले. जन्मगाव असलेल्या अनगडी गावात इस्त्रो शास्त्रज्ञ प्रकाश पेडणेकर व त्यांचे वडील निवृत्त मुख्याध्यापक नारायण पेडणेकर या बापलेकांचा सहृदयी सत्कार करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष गणपती रामू पेडणेकर होते.
- कार्यक्रमात श्री प्रकाश पेडणेकर यांना ज्ञान दिलेले त्यांचे शिक्षक ताराराणी हायस्कूलचे सहशिक्षक संजीव वाटुपकर, अंगणी शाळेतून बदली झालेल्या कीरावळे शाळेतील शिक्षिका सवयरीना फर्नांडिस अंगडी शाळेचे शिक्षक एस के तिप्पंगावर तालुका शिक्षक सोसायटीच्या संचालक मुख्याध्यापक बीबी चापगावकर शाळेचे शिक्षक प्रकाश मादार यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला शाळेच्या बदली झालेल्या शिक्षिका सौ आयरीना फर्नांडिस ला आपली आठवण म्हणून एक स्पीकर देणगी दाखल दिली.
- कार्यक्रमाची सुरुवात मराठी शाळा अनगडीच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली त्यानंतर भारत माता व श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी खानापूर तालुका पंचायत मध्यान्ह आहारचे सहाय्यक निर्देशक महेश परीट ,शंकर कम्मार सर यांनी पेडणेकरांनी मिळवलेले हे यश अभिमानास्पद व युवावर्गाला प्रेरणादायी असल्याचे सांगून तालुक्यातील अन्य युवकांनीही अशा उत्तुंगभरातील सहभागी व्हावे असे आवाहन केले.
- याप्रसंगी तालुका पंचायत खानापूर मध्यान्ह आहाराचे सहनिर्देशक श्री महेश परीट , बीआय इआरटी शंकर कम्मार ,सी आर पी प्रमुख श्री यल्लाप्पा कोलकार, कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघटना संचालक व नरसेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री गोपाळ पाटील, माजी सी आर पी व KHPS हलशीचे सहशिक्षक श्री गोविंद पाटील, बीजगर्णी शाळेचे मुख्याध्यापक वैजू गुरव, मलवाड शाळेचे मुख्याध्यापक अशोक चळकी, सावरगाळी शाळेचे मुख्याध्यापक विनायक कुंभार, गावचे पंच दत्तू पाटील, गेनाप्पा वाटुपकर व इतर पंचमंडळी, शाळा SDMCचे उपाध्यक्षा सौ स्वाती संतोष बरगावकर व सर्व सदस्य, शाळेचे शिक्षक तसेच गावातील नागरिक संख्येने उपस्थित होते.
- या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव वाटुपकर सरांनी व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक यल्लाप्पा कुकडोळकर यांनी केले.