
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) बेळगाव यांच्यावतीने खानापूर तालुक्यातील दोडहोसुर येथे गेल्या 22 वर्षापासून प्रतिवर्षी साजरा केला जाणाऱ्या हरेकृष्ण महा महोत्सवाचे आयोजन आज रविवार दि. 30 मार्च व सोमवार दि. 1 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. येथील श्री मरेवा देवी मंदिराच्या शेजारी आयोजित करण्यात आला आहे.

संस्थापक: कृष्णकृपा श्रीमूर्ती अभयचरणारविंदा भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद शाखा – बेळगाव, हरे कृष्ण प्रचार केंद्र दोड्डुहोसूर यांच्या सानिध्यात होणाऱ्या कार्यक्रमात आज रविवार दिनांक 30 रोजी दुपारी तीन वाजता श्री श्री निताई गौरचंद्र रथोत्सव होणार आहे. रात्री 7.45 वाजता सुरू होईल. वैष्णव भजन व कीर्तन, रात्री 8.15 वा. प्रवचन, रात्री 9.15 वा. सांस्कृतिक नृत्य, रात्री 9.45 वा. रात्री 10.00 वाजता आरती व दर्शन. महाप्रसाद
सोमवार दि. 31/03/2025 रोजी दु. 4 वा. नगर संकीर्तन, सायं. 6.30 वा. अभिषेक, रात्री 7.30 वा. विषेश प्रवचनः प्रवचन कर्ते : प. पू. भक्तीरसामृत स्वामी महाराज रात्री 8.30 वा. नाट्यलिला, रात्री 9.35 वा. आरती व दर्शन रात्री 10 वा. महाप्रसाद सर्व कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन दोडहोसूर पंच कमिटी, गावातील सर्व युवक मंडळे, महिला मंडळे, समस्त ग्रामस्थ व हरे कृष्ण सत्संग मंडळ, यांच्यावतीने करण्यात आले आहे.
संपर्क : 9964325434, 6360724400, 8152908283