खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यातील कक्केरी येथील रहिवासी व भारतीय सेनेत गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत असलेला जवान मंजुनाथ शिवानंद अंबरगट्टी वय 34 यांचे सोमवारी सकाळी दिल्ली येथे ऑन ड्युटीवर असताना अपघातात मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आज बुधवारी सकाळी कक्केरी येथे आणण्यात आला.
जवान मंजुनाथ अंबरगट्टी हे गेल्या 15 वर्षांपूर्वी भारतीय सेनेत दाखल झाले होते. अनेक ठिकाणी त्यांनी सेवा बजावली दिल्ली या ठिकाणी आपली सेवा बजावत असताना सोमवारी सकाळच्या दरम्यान एका वाहनाच्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे सदर जवानाला मंगळवारी सकाळी तेथील लष्करी प्रक्रिया सोपस्कार झाल्यानंतर त्याचा मृतदेह दिल्लीहून साबरा येथे विमानाने आज सकाळी आणण्यात आले. या ठिकाणी लष्करी ईतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी येथील शाळेच्या मैदानावर सदर जवानाचा मृतदेह जेवणात आला व तिथून गावात मिरवणूक काढण्यात आले. या ठिकाणी पोलीस व लष्करी जवान यांनी हजेरी लावली होती. मंजुनाथ अमर रहे… भारत माता की जय च्या घोषणा देत सदर जवानाला गावातील युवा वर्गासह अबालवृद्ध महीलानी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर शाळेच्या पटांगणात व स्मशानभूमीत लष्करी इतमामात सलामी देण्यात आली व त्यानंतर अग्निसंस्कार करण्यात आले यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, यासह विविध क्षेत्रातील मानव मंडळी उपस्थित होते.