खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
विद्यार्थी जीवन हे जीवनाचा पाया आहे. शालेय जीवनात उत्तम आरोग्यसह चांगल्या ज्ञानांकनाची अत्यंत गरज आहे यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे काळाची गरज बनते यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकतेचे व क्रीडा क्षेत्रातील ज्ञानांकनाचे कौतुक करणे ही आपली जबाबदारी असून यासाठीच आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून वेळोवेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम आपण हाती घेतो. असे उद्गार देसाई फाऊंडेशनचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी व्यक्त केले.
दि.15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमनिमित्त कापोली येथील श्री.रमेश गणपतराव देसाई फाउंडेशनच्या वतीने टीशर्ट चे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कापोली हायस्कूल आणि प्राथमिक शाळा कापोली या दोन्ही शाळांमध्ये सातवी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रोख बक्षीस,स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. फाउंडेशनचे संस्थापक श्रीमान रमेश देसाई यांनी हायस्कूलचे ध्वजारोहण केले. प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन मोफत टी शर्टचे वितरण केले.
यावेळी देसाई यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी सर्व करण्याची हमी दिली. कापोली येथील विद्यार्थ्यांसाठी बेळगाव येथे वसतिगृहाची सोय केली आहे व त्यासोयिचा लाभ घेण्याची विनंती केली. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची ग्वाही दिली.
कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी कापोली ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा श्रीमती नमिता देसाई उपस्थित होत्या.हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीमान पी. टी. मेलगे यांनी आपल्या भाषणात सरांच्या कार्याचे कौतुक केले.
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य लढ्यातील देशभक्तांची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना देशाभिमानाची जाणीव करून दिली. मुख्याध्यापक श्री.पी.टी.मेलगे यांना मुख्याध्यापकपदी बढती मिळाल्याबद्दल रमेश देसाई फाउंडेशनचेवतीने सत्कार करण्यात आला.यावेळी कापोली गावातील माजी ग्राम पंचायत अध्यक्ष श्री.संदीप देसाई. यांनीही दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बक्षिसे जाहीर केली.
यावेळी रमेश देसाई फाउंडेशनचे पदाधिकारी श्री .संतोष रामचंद्र देसाई .श्री.अविनाश बालेकुंद्री हे उपस्थित होते अविनाश बाळेकुंद्री यांनी बक्षीस स्वरूपात 5000/- रुपयाची शाळेच्या नावे ठेव रक्कम दिली
याप्रसंगी प्राथमिक , माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री . पी . टी.मेलगे ,श्री .सूर्यकांत शिंदे सहशिक्षक ,सहशिक्षिका सर्व विद्यार्थी, महिला वर्ग,ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. शाहू नांगणुरकर यांनी केले,प्रास्ताविक व स्वागत श्रीमती स्नेहा पाटील यांनी केले . श्रीमती उज्वला पाटील आभार मानले. यावेळी सहशिक्षीका मनीषा पाटील, एस .एम . बेळगावकर
अंगणवाडी कर्मचारी माजी विध्यार्थी शाळेचे क्लर्क श्री .वैभव देसाई आदी उपस्थित होते.