- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: एखाद्या गावातील एकता व बांधिलकी ही त्या गावच्या विकासाचे प्रतीक ठरते. भारतीय संस्कृती त मंदिराना विशेष महत्त्व आहे. जसे अयोध्येतील राम मंदिर हे आपल्या देशाचे वैभव ठरले तसेच प्रत्येक गावातील मंदिर हे त्या गावचे वैभव ठरावे यासाठी मंदिरांची उभारणी ही त्या गावातील सौंदर्यात भर टाकणारे पडते. मंदिराची स्वच्छता ,पुजा अर्चा केल्याने गावात शांतता राहते. म्हणून गावात मंदिराची उभारणी व्हावी.ही ग्रामस्थाची मागणी गेल्या कित्येक वर्षापासुन होती ती आज पूर्ण झाली. याचा मला अभिमान वाटतो असे विचार आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी खानापूर तालुक्यातील निडगल येथे आयोजित व्यायाम मंदिर तसेच श्री हनुमान मंदिराचा उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले. नव्याने जीर्णोद्धारित करण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिर व व्यायाम मंदिर तथा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या उभारणी प्रसंगी ते बोलत होते.
- माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर कार्यक्रमात ते बोलताना म्हणाले, हनुमान मंदिर उभारणीसाठी गावकर्याचे प्रयत्न आज फळाला आहे. या गावातील वडीलधारी मंडळींनी एकीच्या माध्यमातून संपूर्ण गावाला एक आदर्श असे मंदिर उभारले आहे यासाठी गावातील प्रत्येक नागरिकांची साथ ही मोलाची ठरते गावातील एकी बांधील की ही ह्या गावचे वैभव असून आजच्या युवा पिठाला योग्य दिशा मिळावी म्हणून व्यायाम शाळा उभारली. तेव्हा युवकानी व्यसनाच्यामागे न लागता नियमित व्यायाम शाळेत जाऊन आपले शरीर सदृढ बनवा असे आवाहन केले.
- निडगल (ता .खानापूर) येथील नव्याने बांधण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिर,बालभीम व्यायाम मंदिराचा लोकार्पण सोहळा तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे उदघाटन असा संयुक्त कार्यक्रम शुक्रवारी दि १० रोजी उत्साहात संपन्न झाला.
- प्रारंभी मंदिराचा कळसारोहण प .पू चैतन्य प्रभू महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. तर मंदिराचे लोकार्पण सोहळा माजी आमदार अरविंद पाटील याच्या हस्ते फित कापून करण्यात आले.तर अश्वरूढ शिवाजीच्या पुतळ्याचे उदघाटन आमदार विठ्ठलराव हलगेकर याच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष रावसाहेब पाटील होते. बलभीम व्यायाम शाळा हाॅलचे उदघाटन प्रमोद कोचेरी, व प्रमोद कदम यानी केले. यावेळी दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांच्या हस्ते करण्यात ग्रामस्थानी केले आहे.
- यावेळी व्यासपीठावर आमदार विठ्ठलराव हलगेकर ,प्रा.भरत तोपिनकट्टी ,परशराम कदम , गणपत पाटील भरमाणी पाटील, राजू सिध्दाणी व भाजप पदाधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाला तालुक्यातील मान्यवर गावचे नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.