खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
कृषी पतीन सहकारी संघ हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक स्तोत्र आहे. शून्य टक्के व्याजदर विविध योजना सह आरोग्य विषयक शासनाच्या सुविधा मिळवून देण्यात कृषी पतीन सहकारी संघानी अनेक धोरणे आखाली आहेत. खानापूर तालुक्यात आतापर्यंत 52 कृषी पतीन सहकारी संघ आहेत. नव्याने आता चार ते पाच ठिकाणी कृषी पतीन सहकारी संघांची स्थापना केली जात आहे. एक पंचायत एक कृषी पतीन सहकार संघ या धोरणानुसार खानापूर तालुक्यातील करंबळ ग्रामपंचायत बरोबर मनतुर्गा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एक नव्याने पतसंस्था सुरू करण्यासाठी जिल्हा सहकारी निबंधक खात्याने परवानगी दिली असून याचा आज उद्घाटन कार्यक्रम होत असून यापुढे या संस्थेतून या भागातील नागरिकांनी पुरेपूर लाभ घ्यावा. असे आवाहन माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी केले. नुकताच तालुक्यातील मनतुर्गा येथे नव्याने विविध उद्देशीय कृषीपतीन सहकारी संघाची सुरुवात करण्यात आली आहे. या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांताराम पाटील होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात भाजपा माजी अध्यक्ष संजय कुबल, बाळाराम शेलार यासह शांताराम पाटील, गजानन पाटील, अण्णाप्पा पाटील, गावडे पाटील, रमेश चव्हाण, नानाजी घाडी, कृष्णा पाटील, सातेरी जोशीलकर, यशवंत गावडे, प्रदीप घाडी, वसंत पाटील, बबन कुलम, मल्हारी कुलम, सुभाष पाटील, बळीराम देसाई, मर्याप्पा देवकरी, प्रेमानंद पाटील, आप्पाजी जाधव, हनुमंत पाटील, चांगदेव मांगेलकर, रामलिंग झेंडे चंद्रकांत पाटील, भाऊराव देसाई कृष्णा देसाई, बळीराम देवलकर, मल्लाप्पा देवलकर रामचंद्र पाटील, मारुती पाटील, विठ्ठल पाटील, रावजी पाटील, यशवंत देसाई, शिवाजी पाटील भरमानी देवलतकर, नूतन गुरव, रुक्मिणी झेंडे, तुळजाराम गुरव, राजाराम पाटील यासह अनेक मंडळी उपस्थित होती.