खानापूर लाईव्ह न्युज / प्रतिनिधी :
- जे के कराटे स्पोर्ट्स असोसिएशन बेळगाम यांच्या सहयोगाने स्वरक्षण कराटे स्पोर्ट्स अकॅडमीचा प्रारंभ खानापूर येथे रविवार दि. 31 डिसेंबर रोजी रवळनाथ मंदिर गुरव गल्ली खानापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. संरक्षण कराटे स्पोर्ट्स अकॅडमी ही खानापूर तालुक्यातील प्रत्येक मुला -मुलींसाठी व युवकांसाठी स्पेशल ट्रेनिंग देणार आहे. या प्रशिक्षणांतर्गत कराटे आणि लाठी ट्रेनिंग याविषयी क्लासेस घेणार आहे. वजन आणि स्टॅमिना वाढवणे, वजन कमी करणे तसेच 7 ते 16 वयोगटातील मुला- मुलींची उंची वाढवण्यासाठी कला शिकवण्यात येणार आहे. शिवाय मुला-मुलींना जिल्हास्तरीय, आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत संधी घेऊन मुला मुलींचे भवितव्य उज्वल करता येते. खास करून 16 ते 35 पुढील वयोगटातील मुली व स्त्रियांना आयोगात जीवन जगणे भयंकर भीतीदायक झाले आहे. मुली व स्त्रियांनी स्वतःचे संरक्षण करणे हा या अकॅडमीचा मुख्य हेतू असल्याचेही संयोजकांनी यावेळी खानापूर लाईव्ह बोलताना सांगितले.
- या कराटे शिकण्यामधून आत्मसंरक्षण अनुशासन सदृढ शरीर शारीरिक विकास वजनावर नियंत्रण स्मरणशक्ती वाढवणे आत्मविश्वास आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अशा अनेक गोष्टी सांगता येतात. सदर प्रशिक्षण स्थळ खानापूर येथील रवळनाथ मंदिर खानापूर येथे होणार असून या ठिकाणी विशेष प्रशिक्षक म्हणून ब्लॅक बेल्ट चे कराटे असोसिएशन ऑफ इंडिया बेळगाव जिल्हा अध्यक्ष मास्टर लक्ष्मण नायक हे मार्गदर्शक राहणार आहेत. दररोज सोमवार ते शुक्रवार सकाळी 6.15 ते 7.30 या कालावधीत हे कराटे प्रशिक्षण होणार असून याचा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी युवकाने लाभ घ्यावा असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले आहे.
- या संरक्षण कराटे स्पोर्ट्स अकॅडमी चा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 31 डिसेंबर २०२३ रोजी सकाळी 11 वाजता खानापूर येथील रवळनाथ मंदिर मध्ये आयोजित करण्यात आला असून या अकॅडमीचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर व माडीगोंजी येथील उद्योजक शरद केशकामत यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवळनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव सरदेसाई राहणार आहेत. अतिथी म्हणून माजी आमदार अरविंद पाटील,अर्बन बँकेचे निवृत्त व्यवस्थापक राजाराम जोशी,रमेश मेडिकलचे रमेश जैन, जिल्हा कराटे असोसिएशनचे अध्यक्ष राजू पाटील सह अनेकांना निमंत्रित करण्यात आले आहे.
- सदर असोसिएशन स्थापन करण्यासाठी खानापुरातील काहीही पुढाकार घेतला असून यामध्ये अध्यक्षपदी संदीप ईश्वर पाटील उपाध्यक्षपदी यल्लारी गणपती गावडे सेक्रेटरी पदी मारुती शिवाजी गावडे, उपसेक्रेटरी म्हणून प्रमोद आळवणी तर खजिनदार म्हणून संदीप देशमुख यांनी पुढाकार घेतला असूनयामध्ये पदाधिकारी देखील नियुक्त करण्यात आले आहेत. सदर असोसिएशनने खानापूर तालुक्यातील बालक युवकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी या असोसिएशनचे आयोजन केले असून याचा तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसह खेळाडूंनी लाभ घ्यावा असे असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी 9001532788, किंवा 9823780283 क्रमांकाचे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.