Oplus_16908288

Oplus_16908288

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : शहराच्या महत्त्वाच्या आणि वर्दळीचेठिकाण असलेल्या शिवस्मारक चौकात आता लवकरच 10 रुपयात नाश्ता आणि 15 रुपयात जेवण अशा इंदिरा कॅन्टीनला सुरुवात होणार आहे. सदर इंदिरा कॅन्टींग चा शुभारंभ येत्या शनिवार दिनांक 21 जून रोजी दुपारी बारा वाजता जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी, महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी आमदार विठ्ठल हलगेकर राहणार आहेत.

गेल्या काही वर्षापासून राज्य सरकारच्या महत्वकांक्षी ठरलेल्या इंदिरा कॅन्टींग ची सुरुवात कर्नाटकातील अनेक भागात यापूर्वी सुरू झाली आहे. मात्र खानापूर शहराच्या ठिकाणी हे कॅन्टीन कधी सुरू होणार असा प्रश्न अनेकातून निर्माण झाला होता. अखेर ते स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे . खानापूर शहरातील मध्यवर्ती असलेल्या शिवस्मारक चौकातील खानापूर तालुका हॉस्पिटलच्या आवारात या इंदिरा कॅन्टींग ची मॉडेल रिक्षा स्टॅन्ड च्या बाजूला उभारण्यात आली आहे. राज्य सरकार तसेच नगरपंचायत यांच्या सहयोगातून सदर इंदिरा कॅन्टींग चालणार आहे. या इंदिरा कॅन्टींग मधून दररोज 10 रुपयात नाश्ता आणि 15 रुपयात जेवण सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे गोरगरिबांसाठी हे अल्पदरात अन्नक्षेत्र राहणार आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us