खानापूर लाईव्ह न्यूज/ प्रतिनिधि:
- खानापूर तालुका हा भौगोलिक विस्ताराने तसेच धार्मिकतेने वैभव संपन्न तालुका मानला जातो. अनेक गावातील पुरातन काळाची मंदिरे या तालुक्यातील धार्मिकतेची साक्ष देतात. त्यामुळे एखाद्या पुरातन मंदिरांचा ठेवा असलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून त्या गावात एक वैभव संपन्न असे धार्मिकतेचे व्रत, मठ तयार होतात. त्या ठिकाणी दैवी सात्विकता असते. हलगा या ठिकाणी पूज्य श्री गोपाळ महाराज यांच्या प्रदीर्घ काळातील सानिध्यातून या गावची ओळख देशभरात दिसून आली. गोपाळ महाराजांच्या मुखातून येणारे शब्द वचनी व दिशा देणारे ठरत असतात. महाराजांनी स्वार्थ न ठेवता परोपकारी जीवन जगण्यामध्ये समाधान मानले. परप्रांतातून आलेल्या या थोर व्यक्तीने गावातील मंदिरांचा विकास करण्यासाठी अथक परिश्रम व आर्थिक देणग्याही जमा करून गावच्या वैभवात भर पाडले आहे. त्यामुळे जीर्णोद्धारित करण्यात आलेले दक्षिणमुख श्री हनुमान मंदिर गावच्या वैभव आतील भर टाकणारे ठरते असे विचार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले. रविवारी खानापूर तालुक्यातील हलगा येथे नव्याने जीर्णोधारित करण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिराचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी ते उद्घाटक या नात्याने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक ह भ प रवळू फठाण होते.
- यावेळी झालेल्या कार्यक्रमात मंदिराचे उद्घाटन पूज्य श्री दिवंगत गोपाळ महाराज हलगा यांचे बंधू काका महाराज यांच्या हस्ते पार पडले. तर गाभाऱ्याचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर तसेच नीधर्मीय जनता दलाचे नेते नासिर बागवान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी जिल्हा पंचायत सदस्य ज्योतिबा रेमानी, माजी जिल्हा पंचायत सदस्य पुंडलिक कारलगेकर, लैला शुगरचे एम.डी सदानंद पाटील, माजी उपसभापती मल्लाप्पा मारीहाळ, हालगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील, खानापूर कृषीपतींचे संचालक शंकर पाटील, घोटगाळी कृषीपतींचे अध्यक्ष रफीक हलसीकर, उद्योजक शिवानंद मुगळीहाळ ,विनायक लिमये, डॉक्टर मनोज जोशी, म ए समिती नेते निरंजन सरदेसाई, माजी तालुका पंचायत सदस्य विठ्ठल गुरव तसेच ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पाटील, प्रवीण गावडा उपाध्यक्ष मंदा पठाण, महिला सदस्य या वर्गातील कृषीपतीन संघ संस्थांचे पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी व पुणे स्थित उद्योजक उपस्थित होते. यावेळी मंदिराच्या जीर्णोदरासाठी मोठे आर्थिक सहाय्य केलेले माजी आमदार अरविंद पाटील यांनाही निमंत्रित करण्यात आले होते, पण ते काही कामानिमित्त परगावी असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचीही कृतज्ञता यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मंदिरासाठी योगदान दिलेल्या अनेक मेस्त्री देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित उपस्थितांचे स्वागत सदस्य रणजीत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक एस टी पाटील यांनी केले.
- या कार्यक्रमाच्या निमित्ताने सायंकाळी चार वाजता महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. तर रात्री 9 वा न्यायमूर्ती ह भ प विठ्ठल दादा वासकर महाराज पंढरपूर त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला आहे.