
खानापूर : खैरवाड ता. खानापूर येथे जीर्णोद्धारीत करण्यात आलेल्या हनुमान मंदिराचा वास्तुशांती व प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला मंगळवारपासून सुरुवात झाली. तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. या निमित्त मंगळवार दि. ८ रोजी सायंकाळी ६ वाजता गावातून हनुमान मूर्तीची व कलशाची मिरवणूक, दैवदवतांची भेट, रात्री ९ वाजता जलाधीदास झाला.
बुधवार दि. ९ रोजी होमहवन पार पडले. आज गुरुवार दि. १० रोजी वास्तुशांती, नवग्रह शांती, -प्राणप्रतिष्ठापना, पंचामृत अभिषेक, सकाळी ७ वाजता बिळकी-अवरोळी मठाचे चन्नबसव देवरु यांच्या हस्ते कळसारोहण होणार आहे. सकाळी १० वा. मंदिराचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यल्लाप्पा झुंजवाडकर राहणार आहेत.
या कार्यक्रमाला विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार अंजली निंबाळकर, लैला शुगर्सचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील, खानापूर को-ऑप. बँकेचे चेअरमन अमृत शेलार, जि. पं. माजी सदस्य जोतीबा रेमाणी, व्हन्नव्वादेवी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पाटील आदींसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.