खानापुरा/प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यात अकरा दिवस गणरायाचे भक्तिभावाने विसर्जन झाले. खानापूर तालुक्यात श्री गणेशोत्सवाची जुनी परंपरा आहे. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस आणि अकरा दिवस अशा वेगवेगळ्या टप्प्यांत गणेश विसर्जन केले जाते, प्रामुख्याने अकरा दिवसांचा गणेश विसर्जन सोहळा उत्साहाने, आनंदाने आणि भावनिकतेने केला जातो. मंगळवारी अनंतचतुर्थी दिवशी सकाळपासून घरोघरी गणरायाची सुरू झाली. मात्र सायंकाळनंतर सार्वजनिक सार्वजनिक विसर्जनाला सुरुवात झाली. गावोगावी गणराय विसर्जनाचे कार्यक्रम झाले. मलप्रभा नदीच्या काठावर वसलेल्या अनेक गावांमध्ये नदीच्या पात्रात तर इतर भागात विहिरी, तलावात गणपतीचे विसर्जन करण्याची परंपरा आहे. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप देताना भाविक दिसत होते. खानापूर शहरातील जिजाऊ मित्र मंडळाचा विसर्जनाचा कार्यक्रम रविवारी नवव्या दिवशी पार पडला.
मंगळवारी उर्वरित गणरायांचे विसर्जन करण्यात आले. रात्री सात वाजता गणराय विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. खानापुर शहरात एकाच दिवसात सुमारे 11 गणरायांचे विसर्जन झाले. अशा प्रकारे रात्री उशिरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मलप्रभा नदी घाटापर्यंत जल्लोषात विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. नंदगड गावातील एका गावात गणेशमूर्ती असल्याने येथील तलावात गणेशाचे विसर्जन करण्यात आले. अनेक गावात गणपती असल्याने गणरायाला निरोप देण्यासाठी संपूर्ण गावात रात्री उशिरापर्यंत जल्लोष पाहायला मिळत होता.