खानापुर: ग्रामीण भागातून भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) होतकरू विद्यार्थ्यांची निवड व्हावी व देशाची व जन सामन्यांची प्रामाणिक सेवा त्यांच्या हस्ते व्हावी यासाठी समुत्कर्श संस्था कर्नाटक राज्यात कार्यरत आहे. खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना IAS अभ्यासक्रमाची ओळख व्हावी व पुढे त्यांच्यासाठी कार्यशाळा (Training programne) आयोजित करण्याचा उद्देशाने दि. ०५/०८/२०२३ रोजी ठिक सकाळी १० वाजता लोकमान्य सभागृह, बेळगाव गोवा रस्ता, खानापूर येथे तसेच त्याच दिवशी दुपारी १ वाजता ज्ञानेश्वर कल्याण मंटप, बिडी येथे अभिमुखता (प्राथमिक माहिती शिबीर) आयोजित करण्यात आले आहे. खानापूर शहर व तालुक्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी व पालक वर्ग यांनी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थीत रहावे असे व भारतीय प्रशासकीय सेवे संदर्भात प्राथमिक माहितीचे प्रशिक्षण घ्यावे असे आवाहन खानापूर येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश शाळेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले. या पत्रकार परिषदेला स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे चेअरमन चेतन मनेरिकर, संचालक सुभाष देशपांडे, प्राचार्य स्वाती कमल वाळवे, महेश बिडकर आदी उपस्थित होते.