खानापूर
हॉटेल गणेश: नूतन बस स्टॅन्ड खानापूर
खानापुरात दिमाखदार सुरुवात….!
आजच भेट द्या.. अन् स्वाद घ्या!
खानापूर : खानापूर शहरातील नवीन बसस्थानकाच्या नूतन इमारतीत नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या हॉटेल गणेश या कॅन्टीनचा शुभारंभ नुकताच एआयसीसीच्या सचिव व खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. या शानदार हॉटेल लोकार्पणानंतर बस आगारात येणाऱ्या व परिसरातील प्रवाशांच्यासाठी सुग्रास भोजन तसेच चहा नाश्ता सह विविध प्रकारचे मेनू माफक दरात ग्राहकांच्यासाठी सुरू करण्यात आले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसापासून चव चाखण्यासाठी ग्राहकांची एकच गर्दी होत आहे. दररोज सकाळी साडेअकरा ते सायंकाळी चार पर्यंत सुग्रास शाकाहारी भोजन, सकाळ व सायंकाळ चहा कॉफी यासह विविध प्रकारचा नाश्ता माफक दरात हॉटेलमधून उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे बस आगारात येणाऱ्या प्रत्येक प्रवासी ,ग्राहक यांच्यासाठी उत्तम सोय झाली आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये एकदा अवश्य भेट द्या.. असे आवाहन व्यवस्थापकानी केले आहे.