Home » खानापूर: चोर्ला नजीक भीषण अपघात; कार चालकाचा जागीच मृत्यू

खानापूर: चोर्ला नजीक भीषण अपघात; कार चालकाचा जागीच मृत्यू

file_000000006688820792425116a829801e

खानापूर तालुक्यात भीषण अपघात; कार चालकाचा जागीच मृत्यू

खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबी गावच्या हद्दीत बेळगाव–चोर्ला मार्गावर डेल्टा नजीक टप्पर वाहन आणि कारची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात रवी कृष्णा तुळजाई (वय 44, रा. आनंदनगर, वडगाव, बेळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजता हा अपघात घडला. खानापूरकडून जांबोटीमार्गे गोव्याच्या दिशेने जाणारे KA-04/T-8192 क्रमांकाचे टप्पर वाहन कणकुंबी गावच्या हद्दीत बेळगाव–चोर्ला रस्त्यावर आले असता, चालकाने वाहन वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने समोरून येणाऱ्या KA-22/MA-5226 क्रमांकाच्या कारला जोरदार धडक दिली.

या अपघातात कारमधील रवी कृष्णा तुळजाई यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. टप्पर वाहनाच्या चालकासही दुखापत झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.

या प्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. अपघाताची नोंद 30 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 2.15 वाजता करण्यात आली असल्याचे अहवालात नमूद आहे.

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us