खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
अलीकडच्या काळात समाजासाठी झटणारी माणसे फारच कमी आहेत. स्वार्थ, परमार्थ या दोन्ही गोष्टींमध्ये जीवनात परमार्थाला विशेष महत्त्व मानले जाते. आपण कमावलेल्या खिशातला काही भाग समाजासाठी दान करावा समाज यांच्या सुखदुःखात तो वाटावा शिवाय समाजातील दिनदलित व गुणवंतांचा गौरव वाढवून त्यांना प्रोत्साहन द्यावे यासाठी जी व्यक्ती झडते त्या व्यक्तीच्या पाठीवर कौतुकाची थाप ही ऊर्जा शक्ती बनते. अशाच प्रकारे खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ते ईश्वर घाडी यांनी घाडी फाउंडेशनच्या माध्यमातून खानापूर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून विविध उपक्रम राबवत एक आपली ओळख निर्माण केली आहे. आज खानापूर येथे तालुक्यातील काही गुणवंतांचा व विविध शालांत परीक्षेत प्रावीण मिळून गेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन व ऊर्जा देण्याचे काम केले आहे अशा कामाला प्रोत्साहन देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे गौरवउद्गार खानापूर तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष नाडगौडा यांनी व्यक्त केले. रविवारी खानापूर घाडी फाउंडेशनच्या वतीने आयोजित गुणवंतांचा सत्कार सोहळा कार्यक्रमात ते अध्यक्ष या नात्याने बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर घाडी फाउंडेशनचे संस्थापक ॲड ईश्वर घाडी संचालिका सौ पार्वती ईश्वर घाडी, तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष व्हीएम बनोसी, जांबोटी अपंग कल्याण संस्थेचे अध्यक्ष व निवृत मुख्याध्यापक एस जी शिंदे, डॉ. अंजली निंबाळकर फाउंडेशनचे विश्वस्त सुरेश जाधव, क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार, निवृत्त मुख्याध्यापक बी. बी पाटील, तालुका बार असोसिएशनचे सदस आर एन पाटील, दैनिक पुढारी प्रतिनिधी वासुदेव चौगुले, सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिरजे, , तालुका ग्रामपंचायत युनियनचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, निवृत्त बँक व्यवस्थापक विठोबा वेताळ, राजेश पाटील, कृष्णा मन्नोळकर, आदी उपस्थित होते. बी. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. घाडी फाउंडेशनचे संचालक हरिश्चंद्र घाडी. यासह अनेक जण उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावरून बोलताना पत्रकार वासुदेव चौगुले यांनी घाडी फाउंडेशन च्या वतीने अनेक वेळा उपक्रम राबवत समाजात एक चांगली छाप ठेवली आहे एक उत्कृष्ट अभिव्यक्ती म्हणून एडवोकेट ईश्वर गाडी व त्यांच्या धर्मपत्नी एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेता गोवा या ठिकाणी त्यांचा समाज रत्न व उत्तम गृहिणी म्हणून एका संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला ही अभिनंदन ही बाब आहे असेच कार्य यांच्या हातून घडत रावे अशी सदिच्छा व्यक्त करून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार बद्दल केलेली कृतज्ञता याबद्दल त्यांनी आभार मानले.
तरुणांनो, शिक्षण-करियरलाच प्राधान्य द्या: अॅड ईश्वर घाडी :
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचे आयुष्य घडवणारी तरुण पिढी हे समाजाचे खरे आदर्श आहेत. शेतकरी कुटुंबातील मुला मुलींनी आई-वडिलांच्या कष्टांची जाण ठेवून व्यसन आणि चंगळवादाला बळी न पडता शिक्षण आणि करिअरकडेच अधिक लक्ष द्यावे. असे आवाहन वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड ईश्वर घाडी यांनी केले. बहुजन समाजाने पाल्याच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. तालुक्यात दहावी आणि बारावीत प्रथम आलेल्या चारही माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गोल्याळी, मणतुर्गा आणि दारोळी येथील भजनी मंडळांनाही गौरवण्यात आले. राष्ट्रीय पातळीवरील आदर्श समाजसेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल घाडी फाउंडेशनच्या उपाध्यक्ष पार्वती घाडी यांचाही सत्कार करण्यात आला.