IMG-20250117-WA0032

बेळगाव : *विशेष कार्य केलेल्या डॉक्टर्स *मेडिकल सुप्रिडंट प्रा. डॉ. ईराण्णा पल्लेद*, *डिस्ट्रिक्ट सर्जन प्रा. डॉ. आर. सी. सुधाकर*, रेडिओलॉजिस्ट प्रा डॉ. एस. आर. सिद्धाप्पा यांचा सन्मान करताना. निंगाप्पा(आप्पा) जाधव, श्रीधर पाटील, मंजुनाथ कांबळे, प्रा निलेश शिंदे, हरीश मेत्री, लक्ष्मण गौंडवाडकर आणि इतर.

अ. भा. प्र. ए. सा. सा. प. बहुउद्देशीय संस्थेतर्फे व्याख्यान आणि विशेष कार्य केलेल्या डॉक्टरांचा सत्कार सोहळा संपन्न

बेळगाव : समाजात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची आहे; ते त्यांचे जीवन रुग्णांच्या कल्याणासाठी वाहून घेतात. रोग व आजारातून जलद बरे होण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतात; ते वैद्यकीय शास्त्र मोठ्या प्रमाणात समजतात आणि रुग्णांच्या वैद्यकीय स्थितीवर उपचार करण्यासाठी व त्यांची आयुर्मान वाढविण्यासाठी त्यांचे ज्ञान वचनबद्ध करत असतात. बेळगाव जिल्हा वैद्यकीय रुग्णालय मध्ये डॉक्टरांनी अतिशय मोठे कार्य कोविड महामारीच्या काळात व नंतर आजतागायत कार्य केले आहे. सर्वसामान्य गरीब जनतेच्या हितासाठी व कल्याणासाठी अहोरात्र डॉक्टरांनी कार्य केलेले आहे त्यांचे विशेष कौतुक करणे अत्यंत गरजेचे असून त्यांची नैतिक जबाबदारी सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे; ती त्यांनी पार पाडली आहे. त्यामुळे सर्वसमान्य जनतेला याचा मोठा फायदा झालेला असुन विविध योजना व उपचार सर्वसामान्य जनतेपर्यंत आरोग्यपूर्ण कल्याणकारी योजना पोचवण्याचा प्रयत्न करणे अत्यंत जरुरीचे आणि गरजेचे आहे. डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी अतिशय स्नेहाचे व प्रेमाचे नाते निर्माण करून रुग्णांच्या मनातील भीती दूर करून उपचार करणे महत्त्वाचे असते त्यांच्या मनातील भीती दूर करून मनोबल वाढवणे. आरोग्यपूर्ण वातावरण निर्मिती करणे. समतोल आहार सेवन करण्यास प्रवृत्त करणे. आरोग्य क्षेत्रामध्ये कार्य करत असताना रुग्णांची सेवा आणि सुश्रुषा करतांना जीव लावून अतिशय प्रामाणिक तळमळीने सेवा करायला हवी. असे प्रतिपादन बेळगाव जिल्हा रुग्णालयाचे मेडिकल सुप्रिडंट ( एम. एस. ) प्रा. डॉ. ईराण्णा पल्लेद यांनी आरोग्याचे महत्त्व आणि डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका व रुग्णांनी घ्यावयाची काळजी या विषयावर ते व्याख्यानात विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समाजसेवक व एपीएमसी चे माजी अध्यक्ष निंगाप्पा (आप्पा) जाधव होते.

अखिल भारतीय प्रगतिशील एल्गार सामाजिक साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था बेळगाव जिल्हा आणि बेळगाव जिल्हा समाजसेवकांच्यावतीने विशेष कार्य केलेल्या डॉक्टरांचा सत्कार सोहळा आणि बेळगाव जिल्हा रुग्णालयाचे मेडिकल सुप्रिडंट ( एम. एस. ) प्रा. डॉ. ईराण्णा पल्लेद यांचे आरोग्याचे महत्त्व आणि डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका व रुग्णांनी घ्यावयाची काळजी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन बीम्स सिव्हील हॉस्पिटल येथील सभागृहात मंगळवार दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

व्यासपीठावरील कलखांब ग्रामपंचायतचे सदस्य मंजुनाथ कांबळे, परिषदचे अध्यक्ष श्रीधर पाटील, समाजसेवक मारुती बडीगेर, डी वाय एस चे अध्यक्ष हरिष मेत्री, कवी प्रा निलेश शिंदे, प्रा. शशिकांत घामणेकर माजी नगरसेवक अनिल पाटील, डॉ. गजानन वर्पे, बाळू कूरुबर, लक्ष्मण गौंडवाडकर, प्रा. विशाल करंबळकर या मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी बेळगाव जिल्ह्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय विशेष कार्य करणाऱ्या व्यासपीठावरील डॉक्टरांचा अ. भा. प्र. ए. सा. सा. प. बहुउद्देशीय संस्थेतर्फे व बेळगाव जिल्ह्यातील समाजसेवकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला त्यामध्ये

  1. बेळगाव जिल्हा रुग्णालयाचे मेडिकल सुप्रिडंट ( एम. एस. ) प्रा. डॉ. ईराण्णा पल्लेद
  2. डिस्ट्रिक्ट सर्जन प्रा. डॉ. आर. सी. सुधाकर
  3. माजी मेडिकल सुप्रिडंट व सर्जन प्रा. डॉ. गिरीष दंडगी
  4. रेडिओलॉजिस्ट प्रा डॉ. एस. आर. सिद्धाप्पा या मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

स्वागत समाजसेवक परिषदेचे अध्यक्ष श्रीधर पाटील यांनी केले. प्रास्ताविक समाजसेवक कवी प्रा. निलेश शिंदे यांनी केले. परिचय गजानन मादर आणि प्रा. शशिकांत धामणेकर यांनी करून दिला.
यावेळी यल्लाप्पा पाटील, अजित पाटील, तुकाराम मादार, विजय पाटील, सागर गुंजीकर, महादेव नार्वेकर, आर. एम. मोहिते, सुधीर लोहार, प्रसाद पाटील, नारायण पाटील, अमोल सुतार, विनायक लोहार, विनायक पाटील, उमेश पाटील, चंद्रकांत भैरटकर, जे. के. जाधव, शिवा नाईक, मंजुनाथ कांबळे, उदय पाटील होते. सूत्रसंचालन हरिष मेत्री यांनी केले तर आभार प्रदर्शन मारुती बडीगेर यांनी केले. यावेळी विविध संस्थांच्या व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी सदस्य, अधिकारी, डॉक्टर, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी, आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट :

आरोग्य सेवा उत्तम दर्जाचे देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या आरोग्यपूर्ण योजना आखण्यासाठी प्रयत्न असतील. कोरोनाच्या वैश्विक महामारीनंतर पुन्हा एकदा जागतिक पातळीवरील रोग पुन्हा देशात पसरण्याचा संभव निर्माण होत आहे तरी सर्व जनतेनी सतर्क राखून आरोग्याची काळजी घ्यावी. रुग्णालयातील विविध समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू.
——— श्री. सतिश जरकीहोळी
बेळगाव जिल्हा पालकमंत्री आणि पीडब्ल्यूडी मिस्टर कर्नाटक सरकार


Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us