बैलहोंगल : विजेच्या तारेला स्पर्श होऊन पिता- पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील उडीकेरी गावात घडली.
प्रभू हुंबी (वय 69) व मंजुनाथ हुंबी (29) अशी दुर्देवी मृत पिता-पुत्राची नावे आहेत. घरासमोरील विद्युत खांबाच्या तारेला स्पर्श होऊन एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. घराजवळील कचरा काढत असताना हा अपघात झाला.
वीज तारेचा स्पर्श झाल्याने वडील प्रभू हुंबीला विजेचा धक्का बसला त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मुलाचाही मृत्यू झाला. ही घटना दोडावडा पोलीस ठाण्यात घडली.