खानापुर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : शनिवार झालेल्या इदलहोंड कृषीपतीन सहकारी संघाच्या निवडणुकीत बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व माजी आमदार अरविंद पाटील यांच्या गटाने बाजी मारली असून 12 पैकी 9 संचालक निवडून आले आहेत. तर विरोध गटातून 3 उमेदवार निवडून आले आहे.
इदलहोंड कृषी पतीन संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकताच चुरशीने पार पडली. या सोसायटीवर दोन गटात चुरशीची निवडणूक पार पडली यामध्ये माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या गटाने वर्चस्व साध्य केले आहे. या कृषिपतींवर सामान्य कर्जदार गटासाठी झालेल्या निवडणुकीत श्री किरण पिराजी पाटील, चांगाप्पा बाचोळकर, बाळाराम निलजकर हे केवळ एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत. महीला कर्जदार गटासाठी श्री सुनिता पाटील, या विजयी झाल्या आहेत. अ” वर्गातून श्री सुभाष कुंभार यांची निवड झाली आहे. तर श्री विष्णू पाखरे पाटील यांची बीन कर्जदार गटातून निवड झाली आहे. तर एस सी वर्गासाठी झालेल्या निवडणुकीत श्री बसवंत इदलहोंडकर हे निवडून आले आहेत. सामान्य कर्जदार गटासाठी झालेल्या निवडणुकीत विरोधी पार्टीचे म्हात्रू धबाले व नामदेव पाखरे निवडणूक आले. बिनविरोध एसटी श्री चन्नपा बाळन्नावर .
ब गटासाठी श्री संजय जाधव तर विरोधी पक्षाच्या महिला रुक्मिणी गुरव निवडून आले आहेत. सदर सर्व विजयी संचालकांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ,माजी आमदार अरविंद पाटील यांनी अभिनंदन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.