खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : खानापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील जवळपास 40 हून अधिक गावांना संपर्क साधणाऱ्या तसेच खानापूर ते हेमडगा अनमोड मार्गे गोव्याला जवळचा संपर्क येणाऱ्या राज्य मार्गाची दुर्दशा झाली असून या रस्त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पुढाकार घेतला आहे. यानुसार खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे खानापूर हेम्माडगा या राज्य मार्गाची पुनर्बांधणी करण्याबाबत तहसीलदाराना व संबंधित अधिकाऱ्यांना सोमवार दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक १० वाजता निवेदन देण्यात येणार आहे. तरी खानापूर तालुक्यातील रुमेवाडी, शेडेगाळी, हारूरी, ढोकेगाळी, मणतुर्गे, तिवोली, देसाईवाडा, अशोकनगर, तेरेगाळी, नेरसे, गव्हाळी, कोंगळा, पाष्टोली, शिरोली, शिरोलीवाडा, मांगिनहाळ, डोंगरगांव, अबनाळी, जामगाव, हेम्माडगा, पाली, देगाव, मेंढील, तळेवाडी, कृष्णापूर आणि होल्डा या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ठीक १० वाजता बहुसंख्येने निवेदन देण्यासाठी राजा शिवछत्रपती स्मारक येथे जमावे असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील व निरंजनसिंह सरदेसाई आणि सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.