खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
- खानापूर तालुक्यातून उगम पावणाऱ्या हेमडगा सिंदनुर राज्य मार्गापैकी मनतुर्गा क्रॉस ते रेल्वे गेट पर्यंत रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू आहे. सदर रस्ता भक्कम करावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे करून देखील पुन्हा डागडुजीच काम हाती घेण्यात येत आहे. पण केवळ धूळफेक होत असल्याने स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात आवाज उठून रस्ता भक्कम करावा अशी जोरदार मागणी केली आहे. त्यामुळे या रस्त्याचे प्रकरण दोन दिवसापासून चर्चेत आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र होंडकांडे यांनी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन या रस्त्याच्या परिस्थितीची पाहणी केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर बोभाटे,अरविंद शेलार माजी ग्रामपंचायत सदस्य मरू पाटील, पत्रकार वासुदेव चौगुले, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रल्हाद मादार, नारायण भुतेवाडकर, दत्ता राऊत यानी भेटून अधिकाऱ्यांना रस्त्याच्या परिस्थितीची जाणीव केली. केवळ डागडुजी करून हा रस्ता चालणार नाही. या रस्त्यावर गोव्यातून येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. त्यामुळे केलेली डागडुजी ही नाममात्र होऊन रस्ता पुन्हा जैसे ते परिस्थिती होईल यासाठी जेवढा म्हणून रस्ता खराब झाला आहे तो फेरडांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान कार्यकारी अधिकारी राजेंद्र होंडकांडे यांनी या रस्त्याबद्दलच्या भक्कम बांधणीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव करण्यात आला असून ह्या रस्त्याची दुरुस्ती करणे ही आमची जबाबदारी आहे. पण पूरक अनुदान नसल्याने सध्या मंजूर झालेल्या निधीतून शक्य होईल तेवढे काम चांगल्या पद्धतीने करून घेण्याचा आपला प्रयत्न राहील असे यावेळी सांगितले.
तालुका म.ए समितीचेही निवेदन:
- दरम्यान तालुका म ए समितीच्या वतीने देखील या संदर्भात निवेदन देऊन रस्त्या संदर्भात आक्षेप नोंदवला होता.. सदर रस्त्याचे भक्कम काम झाले नाही तर तीव्र आंदोलन सोडण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे. समितीचे चिटणीस आबासाहेब दळवी यांनी सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले असले तरी कामात पारदर्शकता हवी असे त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचित केले आहे.