खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
रामनगर अनमोड गोव्याला होणारी अवजड कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी बंद ठेवल्यामुळे त्यातच बेळगाव वाया चोरला ते गोवा या राज्यमार्गावरील कुसमळी पूल कमकुवत झाल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक गेल्या महिन्याभरापासून बंद झाल्यामुळे गोव्याला होणारी अवजड वाहतूक खानापूर शंकरपेठ मार्गे जांबोटीहून मोठ्या प्रमाणात वाढल्याने या मार्गावरील वाहतुकीची होणारी कोंडी व अडचण लक्षात घेता या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात यावी अशी विनंती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे केली होती. या आमदारांच्या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी रामनगर मार्गावरील अवजड वाहतूक खुला करण्यासाठी कारवार जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून आता ही समस्या दूर केली असल्याची माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर लाईव्ह बोलताना दिली.
आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिलेली माहिती की, गोव्याला होणारी अवजड वाहतूक ही नेहमी रामनगर अनमोल मार्गे किंवा पीरणवाडी चोरला मार्गे सुरु होती. पण कुसमळी पुल कमकुवत झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून बंद केली आहे. पावसाळ्यात रामनगर अनमोड मार्गावरील रस्त्याचे काम अर्धवट आल्याने या मार्गावरील वाहतूक कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केल्यामुळे अवजड वाहतुकीचे दोन्ही रस्ते बंद होऊन गोव्याला होणारी अवजड वाहतूक खानापूर शंकरपेठ जांबोटी मार्गे सुरु होती. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा, अनेक वेळा वाहने अडकण्याचे प्रकार व रस्त्याची दुरावस्था होत होती. या भागातील नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांशी गेल्या दोन दिवसापासून आपण सतत संपर्कात राहून शंकर पेट मार्गावरील वाहतूक बंद करण्यासाठी विनंती केली होती. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आता चोर्लां मार्गे होणारी अवजड वाहतूक पूर्णतः बंद झाली तरी खानापूर रामनगर अनमोड मार्गे गोव्याला अवजड वाहतूक सुरू करण्यासाठी कारवार जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा करून अनमोड मार्ग खुला केला आहे त्यामुळे आता या अवजड वाहतुकीची समस्या दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.