खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- बेळगाव लोककल्प फाउंडेशन यांच्या पुढाकाराने वेनुग्राम हॉस्पिटलच्या वतीने चापगाव येथे शनिवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोककल्प फाउंडेशनच्या व्यवस्थापिका मालिनी बाली यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत . या अंतर्गत चापगाव परिसरातील शाळांना दत्तक ग्राम करून योजना हाती घेतले आहेत. या शिबिरात तब्बल 200 जणांनी तपासणीचा लाभ घेतला. येथील मराठी प्राथमिक शाळेमध्ये आयोजित या मोफत आरोग्य शिबिरात उपस्थित त्यांचे स्वागत लोककल्प फाउंडेशनचे संयोजक संतोष कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष मशनू चोपडे उपस्थित होते.
- यावेळी वेणुग्राम हॉस्पिटलच्या डॉक्टर श्री विविध रोगावर उपचार केले. यामध्ये डॉ. ऐश्वर्या , स्टाफ श्रीदेवी मैत्री, पीआरओ जगदीश बेळगावकर, लोककल्प फाउंडेशनचे किशोर नाईक , मराठी शाळेचे मुख्याध्यापक एन एन आर्यन , सहशिक्षिका के एस घाडी कन्नड शाळेचे मुख्याध्यापक के एस सुब्बानी, ए आर मोरे, सामाजिक कार्यकर्ते महादेव दळवी, पत्रकार पिराजी कुऱ्हाडे आधी उपस्थित होते.
- या शिबिरात दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तसेच गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. लोककल्प फाउंडेशनच्या वतीने चापगाव येथील शैक्षणिक विकासासाठी दत्तक ग्राम उपक्रम राबवला आहे. सदर फाउंडेशन च्या वतीने यापूर्वी ग्रीन बोर्ड शाळांना देणगी दाखल दिली आहे. त्यानंतर आता हा मोफत आरोग्य शिबिराचा दुसरा कार्यक्रम लोककल्प फाउंडेशनने हाती घेतला असून पुढील काळात विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवून शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आपले प्रयत्न असणार असल्याची माहिती लोककल्प फाउंडेशनचे संयोजक संतोष कदम यांनी यावेळी दिली.