Screenshot_20231125_194136
  • खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
  • खानापूर तालुक्यातील हातरवाड येथे दरवर्षी होणाऱ्या एक गाव एक तुळशी या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवार दि 26 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे पारंपारिक रित्या साजरा होणारा हा तुळशी विवाह सोहळा म्हणजे शक्ती देवतेचा उत्सवच म्हणावा लागेल. तालुक्यातील हतरवाड, मेंढेगाळी, कीरहलशी येथील सामुहिक विवाहाला एक वेगळेच महत्त्व आहे. हतरवाड येथील गावच्या मध्यभागी असलेली व गावात एकमेव असलेली तुळस नवसाला पावणारी तुळशी देवता मानली जाते. त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. दि. 29 रोजी रात्री नऊ ते साडेदहा या कालावधीत होणार आहे.
  • हत्तरवाड येथे पूर्वापार गावच्चा मध्यभागी असलेल्या तुळसी वृंदावनाचे महत्व वेगळे आहे. या उत्सवाला गावातील सर्व माहेरवासिय मुली एकत्र आलेल्या असतात, भक्तांच्या नवसाला ही तुलसी वृंदावन पावते असा विश्वास आहे. त्यामुळे जिल्हयातील अनेक गावातून संतान प्राप्ती, संकट निवारणासाठी देवीला नवस मागण्यासाठी मोठ्या संख्येने सोहळ्याला भक्तजण उपस्थित राहतात, विशेषत महिलांची उपस्थिती मोठी असते. रविवारी रात्री ९ नंतर गावातील प्रमुख हक्कदार, वतनदार, पुजारी सांच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा होणार आहे.
  • त्या निमित्त सोमवार 27-11-2023 रोजी रात्री 9 वाजता. कारलगा येथिल श्री संत एकनाथ भजनी भारूड हा कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमाला समारंभाचे अध्यक्ष श्री. मष्णू ल. पाटील पोलिस पाटील हत्तरवाड यांच्या उपस्थितीत तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर माजी आमदार अरविंद पाटील, हलगा ग्रामपंचायतचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यासह अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी सार्वजनिक आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री तुळसादेवी कला मित्र मंडळ, पंच मंडळी व ग्रामस्थ हत्तरवाड यांच्यावतीने करण्यात आले आहे
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us