IMG_20250514_154425

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :

प्रतिवर्षाप्रमाणे चापगाव येथील मलाप्रभा नदी काठावर स्थापित असलेल्या असे श्री हातखंडेश्वर (हातखंडा) देवाचा वार्षिक उत्सव आज बुधवारी थाटात संपन्न झाला. या उत्सवातील सांगता महाप्रसादाने झाली. सकाळी पंच कमिटी वजनदार कमिटी तसेच या भागातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत महा पूजा झाली त्यानंतर महाप्रसाद झाला.
श्री हातखंडेश्वर हे वंकेबैलच्या पंचस्थळातील एक जागृत देवस्थान होय. चापगाव- कारलगा सरहद्दीजवळील मलप्रभा नदीच्या काठावर , दुसऱ्या बाजूला बलोगा गाव. जिथून पूर्वी नदी पार करून जायची, जुनी पायवाट. अशा काठावर वसलेले एक धर्मऋषीचे देवस्थान म्हणजे हातखंडा होय. सदर मूर्ती शेषनाग स्वरूपातील असून हातात शस्त्रधारी आहे. श्री हातखंडा हा पूर्वी नदीच्या काठावर होता. 1955 च्या काळात तेव्हाचे पोलीस पाटील स्व. अप्पू पाटील व गावच्या काही प्रमुखांनी नदी काठावर असलेला हात खंडेश्वर सुरक्षित स्थळी नदीपासून 200 फूट अंतरावर आणून प्रतिष्ठापित केला होता . पण त्या ठिकाणी भक्कम मंदिर असल्याने तेथील मूर्ती चिखलात रुतू लागली. त्यामुळे या भागातील काही शेतकरी व सुज्ञ नागरिकांनी 2010 च्या दरम्यान या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा विडा उचलला. या कामी या भागातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन जवळपास तीन लाख रुपये खर्च करून मंदिराची स्थापना केली. या मंदिर निर्मितीत मराठा समाजासह लिंगायत समाजाचाही सहभागी होतो. त्यानंतर प्रतिवर्षी श्री हातखंडेश्वरला बोकडाचा मान देऊन सार्वजनिक प्रसादाचे आयोजन केले जाते. शिवाय त्यादिवशी शाकाहारी , मांसाहारी अशा दोन्ही स्वरूपाचा स्वयंपाक करून गाव जेवण घालण्याची परंपरा सुरू केली आहे.

श्री हातखंडेश्वर हे या भागातील एक जागृत व रक्षणकर्ता म्हणून ओळखले जाते. या देवस्थानचा अनेकांना साक्षात्कार झाल्याचेही सांगितले जाते सदर देवस्थान या भागाचा रक्षणकर्ता असून रात्रीच्या वेळी हातात घुंगुर घेऊन तो फिरत रात्रीच्या वेळी या देवस्थानच्या मंदिरात अनोळखी व्यक्ती किंवा या दैवतांचे नियम माहित नसलेला व्यक्ती गेल्यास त्यांना त्रास नक्कीच होतो यात शंका नाही. त्यामुळे अलीकडच्या काळातील हे नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ओळखले जाते दरवर्षी अनेक जण या ठिकाणी येऊन नवस मागतात व पूर्ण करतात.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us