
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : प्रति वर्षाप्रमाणे खानापूर तालुक्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या कुपटगिरी येथील श्री विठ्ठल रखुमाई ८८ व्या वार्षिक महोत्सवानिमित्त श्री पांडुरंग अखंड नाम सप्ताह. आज शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी पासून प्रारंभ झाला आहे या सप्ताहाची सांगता रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाने होणार आहे.
शुक्रवार दि. ७-२-२०२५ ते रविवार दि. ९-२-२०२५ पर्यंत ह.भ.प. श्री. पुंडलिक पाचंगे असोगा यांच्या अधिष्ठाणाखाली. अधिष्ठान खाली सुरू असलेल्या या सप्ताह सोहळ्यात शुक्रवार दि. ७-२-२०२५ रोजी रात्रौ ८ वा. संतांचे हस्ते पोथी स्थापना व नित्य पूजा नंतर श्री संत एकनाथ सोंगी भारुड भजनी मंडळ, कारलगा, ता. खानापूर यांचा भजन भारुड कार्यक्रम होईल. शनिवार दि. ८-२-२०२५ रोजी पहाटे काकडा आरती. सकाळी ९ ते ११ ज्ञानेश्वरी वाचन, त्यानंतर सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत भजनाचा कार्यक्रम होईल. नंतर ६ ते ७ प्रवचन सेवा ह.भ.प.श्री. जोतिबा चौगुले, मु. अलतागा यांचे प्रवचन होईल. त्यानंतर ७ ते ८ “जय जय रामकृष्ण हरी” या पवित्र बिज मंत्राचा नामजप. नंतर ह.भ.प श्री. आबालाल पिंजारे मु. कागल, जि. कोल्हापूर यांचे किर्तन होईल. रात्री श्री चव्हाटा सोंगी भारुड भजनी मंडळ, हेबाळ हट्टी यांचा भारूड भजनाचा कार्यक्रम होईल. रविवार दि. ९-२-२०२५ रोजी पहाटे काकडा आरती. त्यानंतर द्वादशी अभंग व आरती.
महाप्रसाद कार्यक्रमाला आमदार, माजी आमदार यांची उपस्थिती:
आदरणीय श्री. विठ्ठल सोमण्णा हलगेकर, आमदार खानापूर तालुका , खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी १२ ते २ पर्यंत महाप्रसाद होईल. सायंकाळी ५ वा. श्रींच्या मंदिरातून श्रींची पालखी निघून मलप्रभेवरील पुंडलिकाची भेट घेऊन गावात पालखी व दिंडी सोहळा होईल. तरी याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ, वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
देणगीदार : श्री. शंकर बाळाराम पाटील, कुपटगिरी संचालक पी. के. पी.एस. खानापूर रु. ७,२०१/- श्री. मल्लाप्पा नारायण पाटील, कुपटगिरी लैला शुगर महालक्ष्मी वजन काटा शासकीय अधिकारी रु.७,०११/-ह.भ.प. सौ. चांगुणा हणमंत पाटील, कुपटगिरी, अध्यक्षा ग्रा. पं. बरगांव रु. ५,५५५/-यांनी देणगी देऊन सहकार्य केले आहे. याशिवाय अनेक भक्ताने लहान-मोठ्या देणग्या या सोहळ्यासाठी देऊ केले आहेत त्यांचे वारकरी मंडळ व पंच कमिटीच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.