
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
बेकवाड तालुका खानापूर येथे माघ शुद्ध दशमी शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी 2025 ते माघ शुद्ध द्वादशी रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत श्री हरिनाम उत्सव सोहळा संपन्न होणार आहे तरी सर्व भाविक भक्ताने या सोहळ्यात सक्रिय भाग घेऊन श्री माऊलीच्या सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती श्री संत कृपेने व ह भ प गुरुवर्य तात्यासाहेब वासकर महाराज पंढरपूर व ‘कै ह भ प रुद्राप्पा हूंचीकट्टी महाराज एम के हुबळी यांच्या कृपाशीर्वादाने बेकवाड गावांमध्ये 43 वा दिंडी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या वेळेत शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी 25 रोजी सायंकाळी चार वाजता ह ब प शटवाप्पा पवार महाराज हालशी यांच्या अधिष्ठनाखाली पोथी स्थापना व पाच ते साडेपाच हरिपाठ सायंकाळी सहा ते सात पर्यंत हरीश भीमराव पाटील बेकवाड यांचे प्रवचन व किर्तन त्यानंतर हरी जागर शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी पाच ते सहा माघ शुद्ध एकादशी पहाटे काकड आरती सायंकाळी 9 ते 12 पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण नववा व बारावा अध्याय बारा ते तीन पर्यंत शाळेतील मुलांचे कार्यक्रम दुपारी चार ते पाच ह भ प आप्पा महाराज कामतगा व ह भ प रमेश पाटील गरबेनहटी व ह भ प मष्णू जोशीलकर यांचे गाथा भजन पाच ते सात नामजप सात ते आठ ह भ प श्रीकांत पाळेकर बिडी यांचे प्रवचन व रात्री 9 ते 12 ह भ प ज्ञानेश्वर पाटील संत कुर्माजी महाराज साखर कारखाना कर्मचारी पंढरपूर यांचे कीर्तन नंतर हरिजागर व पहाटे पाच वाजता गावातून दिंडी निघेल रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी खिरापत होऊन महाप्रसाद होईल तरी या उत्सवाचा तालुक्यातील सर्व वारकरी व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे संयोजनाकडून कळविण्यात आले आहे