IMG-20250317-WA0022

खानापूर : हलशीवाडी येथे खांब बदलण्याचे सुरू असलेले काम
खानापूर : हलशीवाडी येथील लोंबकळनाऱ्या वीज वाहिन्या व धोकादायक खांबे हटवावेत अशी मागणी निवेदनाद्वारे हेस्कॉमकडे करण्यात आली होती याची दखल घेत सोमवारपासून खांब बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
हलशीवाडी येथे अनेक वर्षांपूर्वी वीज खांबे उभारून वीज वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून वीज दुरुस्ती वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या खाली आल्याने अनेकदा समस्या निर्माण होत आहेत. तसेच शॉर्टसर्किट होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने चार दिवसांपूर्वी ग्रामस्थांतर्फे हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता जगदीश मोहिते यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. तसेच खाली आलेल्या वीज तारा व मोडकळीस आलेल्या खांबाची माहिती देत फोटो दाखविले होते. त्यानंतर हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता जगदीश मोहिते यांनी सेक्शन अधिकारी देशपांडे याना पाहणी करण्याची सूचना करण्यात आली होती पाहणी केल्यानंतर खांब बदलण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार कामाला सुरुवात करण्यात आली आहे तसेच लवकरच काम पूर्ण केले जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया
विविध ठिकाणी असलेल्या वीज वाहिन्या व खांब बदलण्यासाठी
हेस्कॉमने काम अशी घेणे गरजेचे आहे. वादळी वारा आणि पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होतो याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन आवश्यक त्या उपाय योजना करणे गरजेचे आहे. शिवारात अनेक ठिकाणी धोकादायक खांबे आहेत याकडेही लक्ष द्यावे
सुरज देसाई, रहिवाशी हलशीवाडी

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us