खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यातील हलगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्या विरोधात ग्रामपंचायत समितीने भ्रष्टाचाराचा आरोप करत अविश्वास दाखल केला होता. या अविश्वासाला ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावून अविश्वासाला स्थगिती मिळवली होती. या सदर्भात गेल्या चार ते पाच वेळा झालेल्या सुनावणीनंतर बुधवारी न्यायालयाने अंतिम निर्णय दिला असून असून प्रांताधिकार्यांनी अविश्वासा संदर्भात जारी केलेली नोटीस ही रद्दबातल करण्यात आल्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत महाबळेश्वर पाटील यांनी दिलेली माहिती की, हलगा ग्रामपंचायतचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्या विरोधात ग्रामपंचायत समितीच्या 10 पैकी 7 सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. यानुसार 16 नोव्हेंबर रोजी अविश्वास ैठकीचे आयोजन प्रांताधिकार्यांनी केले होते. पण या विरोधात महाबळेश्वर पाटील यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत 14 नोव्हेंबरला या अविश्वास प्रस्तावाला स्थगिती आणली होती. त्यामुळे अविश्वास बारगळला होता. या न्यायालयीन वादावर पाच वेळा सुनावण्या झाल्या. त्यानंतर आज 18 डिसेंबर रोजी न्यायालयाने सदर सुनावणीचा निर्णय दिला असून 30 नोव्हेंबरला प्रांताधिकऱ्यांनी अविश्वासा संदर्भात जारी केलेल्या नोटिसला तसेच 14 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अविश्वास बैठकीच्या प्रक्रियेची विरोधातील याचिका रद्द केली आहे. त्यामुळे आता पुढील निर्णय प्रांताधिकाऱ्यांच्या कोर्टात आहे.